महाराष्ट्र
Trending

कोरोना विस्फोट : देशात ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण, महाराष्ट्रातही उच्चांक

बुधवारी राज्यात १७ हजार ४३३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे बुधवारी २९२ जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली. दरम्यान यानंतर राज्यातील उपचाराखाली असलेल्या करोनाबाधितांची संख्या २ लाखांच्यावर पोहोचली आहे. तर राज्यातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येनंही २५ हजारांचा टप्पा पार केला असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
मार्चपासून देशात शिरकाव केलेल्या करोना विषाणूनं भारतात हातपाय पसरले आहेत. देशातील अनेक राज्यांची स्थिती करोनाशी लढा देताना गंभीर बनली आहे. विशेषतः मागील काही महिन्यात देशातील रुग्णसंख्ये स्फोटक वाढ झाली असून, दिवसेंदिवस संकट गंभीर बनत चाललं आहे. त्यातच आता करोनाशी लढा देत असलेल्या भारतानं दुर्दैवानं स्वतःचाच मोडला. जगात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची विक्रम नोंद भारताच्या नावे होती.
बुधवारी (२ सप्टेंबर) देशात जागतिक विक्रमाला मागे टाकेल इतके रुग्ण आढळून आले. एका दिवसात रुग्णसंख्येत विस्फोटक अशा वाढीची नोंद झाली. देशात ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या वाढीबरोबरच जगात एका दिवसात इतके रुग्ण आढळून येणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी या स्थानी भारतच होता. आतापर्यंत तिसऱ्यांदा भारतात ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मागील चार दिवसांतच इतक्या मोठ्या प्रमाणात हे रुग्ण आढळून आले आहेत.
मागील २४ तासात देशातील करोना रुग्णांच्या संख्येत ८३ हजार ८८३ नवीन रुग्णांची भर पडली. त्याबरोबर १ हजार ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ इतकी झाली आहे. यात ८ लाख १५ हजार ५३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २९ लाख ७० ४९३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडाही वाढत असल्याचं दिसत असून आतापर्यंत ६७ हजार ३७६ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.
८३ हजार रूग्णसंख्येच्या जवळपास जगातील एकही राष्ट्र नाही. काही दिवसांपूर्वी ही विक्रमी नोंद अमेरिकेच्या नावे होती. अमेरिकेत एका दिवसात आतापर्यंत सर्वाधिक ७७ हजार २५५ रुग्ण आढळून आले आहेत. १६ जुलै रोजी ही नोंद झाली होती. दुर्दैवानं अमेरिकेला मागे टाकत भारत २९ ऑगस्ट रोजी ७८ हजार ९०३ रुग्णवाढीसह पहिल्या स्थानी पोहोचला होता.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close