पुणे
Trending

मास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल

पुणे शहरात करोना विषाणूं या आजाराने थैमान घातले असून एक लाखाचा नकोसा आकडा शहराने पार केला आहे. या दरम्यान असंख्य नागरिकांचा बळी गेला आहे. हा आजार आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून अनेक उपाय योजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्क न घालणार्‍या व्यक्तींविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत पुणे पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणेकर नागरिकांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली.

करोना आजारापासून दूर राहण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मास्क लावले पाहिजे. अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या. मात्र अनेकवेळा नागरिक मास्क न घालता फिरताना पाहण्यास मिळाले. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्या कारवाईमधून तब्बल एक कोटीचा दंड वसुल केल्याने, शरद पवार यांनी पुणेकर नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी जाताना मास्क घालून बाहेर जावे. तसेच अनावश्यक बाहेर फिरू नये, असे आवाहन केले. तसेच, अशा प्रकारे नागरिकांमध्ये आणखी प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना  केल्या.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close