देशविदेश

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल; BMC क्वारंटाईन करणार?

मुंबई: महाराष्ट्र किसी के बाप का नहीं, असं म्हणारी अभिनेत्री कंगना राणावत अखेर मुंबईत दाखल झाली आहे.सुशांतसिंह प्रकरणात घराणेशाहीवरून वाद निर्माण केल्यानंतर अभिनेत्री कंगनानं हिनं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारवर टीका करणं सुरू केलं आहे. मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असताना कंगना आता मुंबईत दाखल झाल्यानं वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद देण्यात आली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. त्यामुळं शिवसेनेतच्या कार्यकर्त्यांकडून सध्या मुंबई विमानताळवर आंदोलन करत आंदोलन सुरू केलं आहे.

 

कंगना विमानताळातून बाहेर पडली असून ती विशेष गाडीतून मुंबईतील घराकडे रवाना झाली . ती पाली हिल या आलिशान सोसायटीत पोहोचली आहे

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close