महाराष्ट्र
Trending
मोडनिंब मधील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी रस्ता केला बंद
मोडनिंब ( रमेश शिरसट )

मोडनिंब मधील आण्णाभाऊ साठे नगर मधून सुर्वे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर चे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर मुरुम टाकून रस्ताच बंद करत ग्रामपंचायतीचा निषेध केला आहे
. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,मोडनिंबच्या वाॕर्ड क्र.एक व दोन मधील आंबेडकर नगरमधून सुर्वे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करत नागरिकांनी रस्त्यावरच छोटी छोटी कपाटे,तर काहीनी टाॕयलेट व बाथरुम बांधली आहेत.त्यामुळे रस्ता लहान होऊन या रस्त्यावरून येणे जाणे अवघड झाले आहे.हे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीचा अर्ज गणेश नाईक या युवकाने पाच महिन्यापुर्वी दिला होता.त्यानंतर यावर ग्रामपंचायतीकडून काहीच दखल घेतली गेली नाही त्यानंतर गणेश नाईक याने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ही अतिक्रमण काढण्याबाबतचा अर्ज दाखल केला व त्यावर ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करुन भुमिअभिलेख कार्यालयाकडून या रस्त्याच्या बाबत योग्य माहिती घेऊन, प्रत्यक्ष पाहणी करुन,नकाशा व मोजणी करुन अतिक्रमणाबाबत योग्य ती कारवाई करु अशी ठराव मंजुराची प्रत गणेश नाईक यांना देण्यात आली
मात्र यावर ग्रामपंचायतीने कुठलीच कृती न केल्याने गणेश नाईक याने २४ आॕगस्ट पासून पंधरा दिवसाच्या आत हे अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता बंद करु असे निवेदन ग्रामपंचायत व पंचायत समिती कुर्डुवाडीला दिले होते त्यानुसार पंधरा दिवसात हे अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळी अकरा च्या सुमारास गणेश नाईक याने अंबेडकर नगरमधून सुर्वे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक टिपर मुरुम टाकून रस्ता बंद केला आहे .अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी आता रस्ताच बंद केल्याने ग्रामपंचायत यावर काय भुमिका घेते ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Share