
कोरोना काळातही ऑनलाईन शिक्षण देत आपली सामाजिक बांधलकी जपत पिरंगुटमधील संस्कार स्कूलमध्ये वृक्षारोपण करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिननिमीत्त संस्कार स्कूल मधे सोशल डिस्टेंस पाळत,तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून व ज्या ज्या महान लोकांनी शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिले त्यांच्या आठवणींना उजाळा देत वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला
.कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे कुठेही नुकसान हो ऊ नये हा विचार करत असतानाच आपण समाजाचा एक घटक आहोत हा विचार करून आपल्या सजीव सृष्टी साठी वातवरण चांगले रहावे यासाठी झाडे लावणे व ती जगवने ही काळाची गरज आहे म्हणूनच संस्कार स्कूल च्या शिक्षकांनी वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांनाही आपल्या घरी झाडे लावण्यासाठी आवाहन केले.त्याचबरोबर भविष्यकाळात आदर्श शिक्षक घडावेत यासाठी ऑनलाइन अभिनय स्पर्धा,कविता करणे,वक्तृत्व स्पर्धा आशा विविध स्पर्धांचे आयोजन केले.
कोरोना काळातही सर्व वातवरण प्रफूल्लीत रहावे.विद्यार्थी,पालक,शिक्षक व समाजामधे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी केलेला हा प्रयत्न होता.तसेच शिक्षण क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहेत.त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे असे मुख्याध्यापिका स्नेहा साठे म्हणाल्या.या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे,सामजिक कार्यकर्ते रमण गोळे,प्रशांत देशमुख,सुमीना राना,शिक्षक वर्ग उपस्थीत होता.
Share