क्राइम
Trending

धक्कादायक, भूगावमध्ये वेश्या व्यवयाय, पोलिसांनी केली 2 पिडीत मुलींची सुटका

पौड पोलिसांची धडक कारवाई, 2 जणांना अटक

मुळशीत कोरोनाने विळखा घातला असतानाही मुळशीत वेश्या व्यवसायाचे जाळे विणले जात होते. मात्र सतर्क पौड पोलिस यंत्रणेने रविवारी छापा टाकून 2 पिडित मुलींची सुटका करीत दोन जणांना अटक केली आहे.
भुगाव येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खबर पौड पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, पोलिस कॉन्स्टेबल मयुर निंबाळकर, पो.शि.साळुंके, पो शि.मोरे, हे गोपनिय पथक सोबत घेउन भूगावमध्ये छापा एका फ्लॅटमध्ये घातला.
दबा धरून आरोपींच्या सर्व हालचालींची पाहणी केल्यानंतरच सदर फ्लॅटमध्ये जाउन पोलिसांनी छापा घातला. तेथे वेश्यस व्यवसाय चालु असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने पिडीत मुलींची सुटका करीत दोन तरूणांना अटक केली. मुळशीत अनेक दिवसांनी अशी कारवाई करण्यात आली आहे.
अनिकेत रामदास पवार व प्रदिप मारुती खराडे हे मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडून स्वतःची उपजीविका करत होते. सदर आरोपींस अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करीत आहेत. पिडित मुलींना ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेले असून त्यांची रवानगी पुढे महिला सुधारगृहात केली जाणार आहे.
मुळशी भागात कोठेही हॉटेल व फ्लॅटमध्ये अशा प्रकारचे व्यवसाय चालु असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सूचित केले आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close