क्राइम
Trending

खळबळजनक! पुण्यात होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

करोना आजाराची भीती आणि नैराश्यामुळं उचललं टोकाचं पाऊल

पुणे शहरात दिवसेंदिवस करोना विषाणूंची वाढती रुग्ण संख्या प्रशासनासमोर चिंतेची बाब ठरली आहे. या करोनाचा विपरीत परिणाम उद्योग व्यवसायावर झाला असून यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. यामुळे मागील काही दिवसांत बेरोजगार झालेल्या आणि आजारामुळे भीती निर्माण झालेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. अशीच एक घटना पुण्यातील सहकारनगर भागात घडली असून एका तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्यामधून बरा झाल्यावर डॉक्टरांनी, त्याला होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला. मात्र, नैराश्यामध्ये गेलेल्या या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप नागनाथ भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहकारनगरमध्ये संदीप भोसले हे आपल्या कुटुंबासोबत अनेक वर्षापासून राहण्यास होते. संदीप यांच्या वडिलांना देखील करोनाची लागण झाली होती. या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांत संदीप यांना देखील करोना झाल्याचा अहवाल आला.

दरम्यान, भोसले यांच्या कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते. संदीप यांनी करोनावरील उपचार घेतले आणि डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीमधील घरी राहत होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना सासरी सोडले होते. दरम्यान, संदीप यांचा भाऊ काल सकाळच्या सुमारास नाष्टा घेऊन पद्मावती येथील घरी आल्यावर, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

संदीप भोसले यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close