
जगाच्या नकाशावर असलेल्या हिंजवडी आय पार्कमधील हिंजवडीतील ग्रामस्थ कोरोना महामारी, लॉक डाऊन व मंदीवर अडचणीत सापडले आहे. यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्याकडे मिळकत करात 50 टक्के सूट देण्याची मागणी केली आहे.
साखरे, जांभुळकर, हुलावळे परिवारासह समस्त हिंजवडीतील ग्रामस्थांनी केलेल्या या मागणीला गावातील सर्वांनीच प्रतिसाद दिला आहे. मूळात शासनाच्या लॉकडाऊन धोरणामुळे 30 टक्केच आय टी पार्क सुरू असल्याने हिंजजवडीतील अनेक स्थानिक रोजगार बंद पडले आहे. हिंजवडीतील ग्रामस्थांची भाड्याची घरे, दुकाने, गाळे अजूनही बंद असल्यानेमिळकत करात 50 टक्के सूट मागणीला जोर धरत आहे

हिंजवडी ग्रामपंचायतीकडून मिळकत कर भरण्याबाबत आग्रह होत असल्याने ग्रामस्थ व्दिधा मनस्थितीत आहे. सर्व व्यवहाराच बंद असल्याने कर कोठून भरायचा असा प्रश्न अनेक ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.
कर सवलत देण्याबाबत ग्रामपंचायतीसह तालुक्यातील खासदार व आमदार यांच्यापुढेही हिंजवडीतील ग्रामस्थांनी आपली मागणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Share