
पुण्यातील कात्रज – देहू रोड रोडवरील नर्हे आंबेगावच्या जवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपासमोर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने, ट्रकने आठ वाहनांना जोरदार धडक दिली यामुळे भीषण अपघात घडला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज – देहू रोडवरील नर्हे आंबेगावच्या जवळ पेट्रोल पंपासमोर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे त्या ट्रकची रस्त्यावरील सात ते आठ गाड्यांना धडक बसली. यामध्ये चार चाकी, दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर, या भीषण अपघातामध्ये एकूण सहा जण जखमी झाले आहे. त्या जखमीपैकी एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. या घटनेमुळे रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती.
Share