क्राइम
Trending

भूगावमध्ये कोयत्याने बिल्डरच्या कार्यालयावर हल्ला, भागीदारच आरोपी

विकसन करार 50 टक्के भागीदारीचा असताना 60 टक्के हिस्सा द्या या वादातून भूगावमध्ये बिल्डरच्या कार्यालयावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार शनिवारी घडला. वैष्णवी डेव्हलपर्सचे बिल्डर्स धिरज काटे यांनी भागीदार अभिजीत तुकाराम मालुसरे यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
भुगावमधील तांगडे वस्तीजवळील वैष्णवी डेव्हलपर्सचे कार्यालयामध्ये विकसन भागीदार अभिजीत तुकाराम मालुसरे व इतर दोन अनोळखी इसम बेकायदेशीरपणे कार्यालयात घुसुन इंजीनीयर संतोष बिरादार, सुपरवायझर महेश मांगले, सिक्युरीटीगार्ड अक्षय अडागळे, अनिता गिरी, मिरा केंदळे यांना मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून हातातील कोयत्याने ऑफीसच्या आतमधील काचेचा दरवाजा व ऑफीसच्या सर्व खिडक्या तोडुन फोडुन नुकसान केली असल्याची तक्रार पौड पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
सदरचा गुन्हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याने गुन्हा नोंदविण्यासाठी सबळ पुरावा पौड पोलिसांच्या हाती आला आहे. लॉकडाऊननंतर आता बिल्डर्स आणि विकसन भागीदारांमध्ये शांततेच अनेक गावात चर्चा सुरू असताना मुळशीतील कोयता हल्लाची चर्चा जिल्हात सुरू झाली आहे.
अभिजीत मालुसरे यांच्याकडून 50-50 टक्काचर वैष्णवी डेव्हलपर्सने विकसन करारनामा करुन घेतला आहे. मात्र अभिजीत मालुसरे हा अधिक हव्यासापोटी मला 60 टक्के हिस्सा दया अशी बेकायदेशीर मागणी केली असल्याचा आरोप बिल्डर्स धिरज काटे यांनी केला आहे. परंतु त्यास नकार दिल्यानंतर मालुसरे यांनी काम थांबवले होते. याबाबत पौड पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवी डेव्हलपर्स अर्ज केेला होता. यावेळी हा अर्ज दिवाणी स्वरूपाचा असल्याचे सांगून पौड पोलिसांनी मालुसरे व काटे दोघांना समज दिली होती.
विकसन करारनामा झाल्यानंतर मालुसरे यांची 10 गुंठे जागा खोदून वैष्णवी डेव्हलपर्स कार्यालय अभिजीत मालुसरे व त्यांच्या कुटंबियांच्या सहमतीने सुरू केले होते. 2018 मध्ये झालेल्या विकसन करारनुसार होते बांधकाम सुरू असल्याने स्टील व इतर साहित्य कार्यालयाचे आजुबाजुला टाकले आहे . शनिवारी मालुसरे यांनी बिल्डर्सच्या कार्यालयावर हल्ला केल्याने पोलिसांकडे वैष्णवी डेव्हलपर्सला धाव घ्यावी लागली. पौड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close