
पिरंगुट ग्रामपंचायतच्या वतीने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त करोना म्हणीचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तलाठी भाऊसाहेब, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योग्य त्या उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
Share