पुणे
Trending

पिरंगुटमध्ये आज तुळजाभवानी पुरस्काराने सविता भूमकरचा गौरव

मायमुळशी पुरस्कारने होणार पत्रकारांचा सन्मान

पिरंगुट (प्रतिनिधी ):- जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आठवा तुळजाभवानी पुरस्कार मुळशीचे कृृषीरत्न व सर्वप्रथम अँग्रो टुरीझम करणार्‍या सौ. सविता रामचंद्र भूमकर यांना घोषित झाला आहे.
महावार्ता वेब पोर्टलच्या परिवाराच्या वतीने होणार्‍या तुळजाभवानी व माय मुळशी पुरस्काराचे वितरण 23 ऑक्टोंबर रोजी संध्या 5.30 वाजता पिरंगुट मधील घोटावडे फाट्याजवळील श्री क्षेत्र भवानीनगर येथील मंदिरात होईल. मुळशीचे कार्यकुशल तहसीलदार अभय चव्हाण व पौड पोलिस स्टेशनचे कार्यतत्पर वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल व पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहे.
मुळशी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी तसेच आदर्श नर्सरी प्रकल्प, पहिले अ‍ॅग्रो टुरिझम सुरू करणार्‍या सविता भूमकर यांनी यावर्षी पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे.
मायमुळशी पुरस्कार अमोल बोत्रे, महेश मालुसरे या कार्यशील मुळशीकरांसह मुळशी कोरोना संकटाच्या काळात कोरोना योध्दे ठरलेले पत्रकार रमेश ससार, विनोद माझिरे, दिपक सोनावणे, प्रदिप पाटील व कालिदास नगरे यांनाही सम्नानित केले जाणार आहे.
मानपत्र, स्मृतिचिन्ह, श्रीफळ, आणि पुस्तके असे तुळजाभवानी पुरस्काराचे स्वरूप असून मुळशीत विशेष कार्य करणार्‍या महिलेस या पुरस्कार देण्यात येतो. स्वर्गीय वीजतंत्री पांडूरंग दुधाणे यांच्या परिवाराच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत मधुरा भेलके, श्रद्धा वाळिंंबे, मिनाक्षी कुमकर, तनुजा आल्हाट, पूनम मेहता, स्मिता घैसासख आणि कोमल गोळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पिरंगुटचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे, स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, पत्रकार, लेखक संजय दुधाणे, रामदास पवळे, उमेश पवळे यांनी या पुरस्काराची एकमताने निवड केली आहे.

 

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close