
महावार्ता वृत्तसेवा: 24 ऑक्टोंबर याच दिवशी कार्यकुशल आमदार संग्राम थोपटे यांनी सलग तिसर्यांदा आमदारकीचा गड सर केला. हॅटट्रिक विजयपूर्ती साठी राबलेल्या हातांपासून ते कोरोना प्राण गमवलेल्या श्रद्धांजली वहाण्यापर्य॔त आमदार संग्राम थोपटे यांनी वर्षभरातील अनेक आठवणींना सोशल मिडियाव्दारे उजाळा दिला…
आमदार संग्राम थोपटे यांची व्हायरल झालेली पोस्ट पुढीलप्रमाणे…
ऐतिहासिक विजयाची आज एक वर्षपूर्ती झाली, भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील सर्व ज्ञात, अज्ञात अबाल,वृद्ध,माता,भगिनी आणि युवा वर्गाने जो माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला सलग तिसऱ्यांदा विधानसभेत जाऊन आपली सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. निवडणूक झाल्यानंतर 4 महिन्यातच कोरोना सारख्या महामारीने आपल्या सर्वांवर घाला घातला अनेक संकट उभी ठाकली ,त्याच प्रमाणे नियोजित विकास काम देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलो मग त्यामध्ये कोरोना काळातील गरजूना अन्नधान्य किट चे वाटप ,गुंजवणी, भाटघर वीर धरण प्रकल्प ,निसर्ग चक्री वादळामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ,कोरोना काळात रुग्णवाहिका लोकार्पण ,भोर वेल्हा उपजिल्हा रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर पुरवठा ,कोंढरी आणि घुटके गावचे कायमचे पुनर्वसन ,ग्रामीण भागातील विकासासाठी डोंगरीविकास निधी 25/15 ,नसरापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे ,मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची नव्याने स्थापना केली ,भोर नगरपरिषद हद्दीतील कोट्यवधीची कामे मार्गस्थ ,भोर वेल्हा तालुकास्तरावर तातडीने कोविड सेन्टर ची निर्मिती करण्यात आली अशी ज्ञात अज्ञात अनेक विकासात्मक काम या गतवर्षात पूर्ण करण्यात आली , निवडणूक काळात अनेक ज्येष्ठ आणि तरुण सहकारी अनेकांनी मला आशीर्वाद दिले आणि माझ्या खांद्याला खांदा लाऊन या संघर्षमय निवडणूकीमध्ये मला विजयी केले त्यापैकीच काही स्नेहीजनांचे दुर्दैवाने या कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने निधन झाले त्यांना देखील माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनस्वी आभार मानतो आगामी काळात भोर वेल्हा आणि मुळशी तालुक्यांमध्ये अनेक विकासात्मक नियोजीत कामे मार्गी लावण्याचा माझा मानस आहे,या प्रवासात आपण माझी साथ देताल हाच विश्वास उराशी बाळगून पुढील प्रवास निश्चितपणे करतो
धन्यवाद
#आपलाच
#संग्रामअनंतरावथोपटे
#आमदार
भोर वेल्हा मुळशी
Share