
मुळशी तालुक्यातील शक्तीपिठे असणार्या पिरंगुटमधील तुळजाभवानी देवस्थान, हिंजवडतील पांडुरंग वाघेरे यांचे तुळजाभवानी मंदिर, ताम्हिणी देवीसह मुळशीत सर्वत्रच कोरोनामुळे शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. शनिवारी सर्वच मंदिरात होमहवन करण्यात आले. यावेळी कोरोनाचे संकट टळो अशी प्रार्थना देवी भक्त करताना दिसले.
हिजवडी-वाकड मार्गावरील आय.टी. पार्कच्या मुख्यरस्त्यावरील तुळजाभवानी मंदिरात तब्बल 18 वर्षांनंतर शुकशुकाट पहाण्यास मिळाला. स्थानिक शेतकरी पांडुरंग ज्ञानोबा वाघेरे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिारात मोठ्या संख्येने आय. टी. पार्कधील संगणक अभियंताची गतवर्षीपर्यंत गर्दी फुलताना दिसत होती. यंदा मंदिरे बंद असल्याने धार्मिक पूजा करून वाघेरे कुुटुंबिया नवरात्र साजरी करीत आहे. 2002 पासून अनेक आय.टी. अभियंते मंदिरात नियमीत येत असतात. नवरात्रीच्या काळात संध्याकाळी या मंदिराच्या परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. अनेक संगणकतंज्ञ नाराळाचे तोरणेही अर्पण करण्यास येतात. आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिराची शोभाही लेक्ष वेधत असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात शांतता दिसून आली.
हिंजवडीच्या तुलनेत पिरंगुट येथील शिवकालीन तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये सोशल डिस्टन ठेवून भाविकांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. येथेही धार्मिक कार्यक्रम प्रथेप्रमाणे उत्साहात करण्यात आले. मात्र जत्रेचे स्वरूप या परिसरात अनेक वर्षांनंतर लुप्त झालेले दिसते. कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र कार्यक्रम रद्द करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा हा उत्सव साधेपणाने साजरा होत असून यावर्षी कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशी माहिती जय तुळजाभवानी सेवाभावी याकरिता तुळजाभवानी ट्रस्टने ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे, अध्यक्ष उमेश पवळे, उपाध्यक्ष जगदीश निकटे व विश्वस्त मंडळांनी दिली.
जय तुळजा भवानी मंदिर परिसरामध्ये मागील चार वर्षांपासुन पोलीस भरतीसाठी अनेक विद्यार्थी सराव करत आहेत. येथील प्रशिक्षणाचा उपयोग करून आतापर्यंत काही गरजू विद्यार्थी सरकारी नोकरीत रुजूही झाले आहेत. या अनुभवाचा विचार करून, होतकरू युवक ,युवतींना त्यांच्या सर्वांगीण उन्नती करिता मार्गदर्शन व्हावे याकरिता ट्रस्टने आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. कोवीड 19च्या वाढत्या प्रभावामुळे यावर्षीचा नवरात्र उत्सव रद्द करून, उत्सवावरील होणार्या खर्चातुन मुळशीतील विद्यार्थ्यांसाठी हे आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र उभारले जाणार आहे. या युवा केंदाच्या सभागृहाचे भूमीपूजन व तुळजाभवानी पुरस्कार हा कार्यक्रमाही साधेपणाने शुक्रवारी करण्यात आले.
शिवछत्रपतींचे दैवत असणार्या आई जगदंबा तुळजाभवानीची आराधना पिरंगुटच्या देवालयात शिवकाळापासून होत आहे. पिरंगुटच्या टेकडीवरील माता तुळजाभवानीचे मंदिर हे देखील शिवकालीन आहे. पिरंगुट गावठाणातील पेशवेकालीन गणेशमंदिर आणि डोंगरमाथ्यावरील भवानी मातेचे मंदिर हे महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आहेत. शिवकाळात गनिमाविरूध्द झुंज देताना भवानी मातेच्या परिसरात एके दिवशी युध्द झाल्याची आख्यायिका प्रसिध्द आहे. शिवरायांचा एकनिष्ठ सरदार बाजी पासलकर यांनी शत्रूला पिरंगुटच्या माळरानावरून पळून लावले होते. शिवकाळात युध्द जिंकल्यानंतर पवित्र रणभूमीत कुलस्वामीनी आई तुळजाभवानीची प्राणप्रतिष्ठा केली जायची. यानुसार पिरंगुट येथील टेकडीवर मावळ्यांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर बांधले. पिरंगुट पंचक्रोशीतील लोक शिवकाळ, स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मंदिरात पुजाअर्चा करीत आहेत.
Share