महाराष्ट्र
Trending

मुळशीतील कोराना रूग्णांचा खर्च 15 लाखांवर, मायबाप सरकार, माझ्या वडिलांना वाचवा…

मुळशी हॉस्पिटलवर कारवाई करा

महावार्ता न्यूज:- पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील महादेव गिरमे यांचा कोरानावरील उपचाराचा खर्च 15 लाखांवर गेला असल्याने पत्नी व मुलगा हतबल झाले आहे. मुळशी प्रशासनाने चुकीचे उपचार झालेल्या मुळशी हॉस्पिटलवर अजून कोणतीही कारवाई केली नसून रूणांच्या खर्चाबाबतही उदासीन दर्शविली आहे.
मुळशी तालुक्यातील उरावडे गावातील इंडो शटल कंपनीत कामावर असताना महादेव गिरमे यांना कोरोना झाला. सुरूवातीला त्यांच्यावर मुळशी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तेथील चुकीच्या उपचारामुळे त्यांना फुप्फुसाच्या आजार बळावला. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल त्यांना पाठविण्यात आले. तेथे ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. गेली 50 दिवस त्यांच्यावर कोव्हिड व फुप्फुसाच्या आजारावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अजूनही अस्थिर आहे. मुळशी हॉस्पिटलमध्ये दोन लाख 68 हजार रूपये खर्च त्यांच्यावर करण्यात आला.

ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये 11 लाख 50 हजारांचे बील दिले आहे. त्यापैकी इंडो शटल कंपनीने पॉलिसीचे 4 लाख दिले असून उर्वरीत आयुष्यभर जमा केलेले साडेपाच लाख रूपये कुटुंबियांनी खर्च केले आहेत. उर्वरीत रक्कम कुंटुबियांकडे नसल्याने पिरंगुट येथील रहाते घर विकण्याची तयारी पत्नीने दर्शविली आहे.
इंडो शटल कंपनीत जात असल्यामुळे संपूर्ण खर्च हा कंपनीने द्यावा अशी मागणी कुटुंबिय व पत्रकार समन्वय समितीने तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे केली आहे. लवकारात लवकर या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी मुळशीत जोर धरत आहे.
मुळशी हॉस्पिटलवर कारवाई करा
मुळशी हॉस्पिटलमध्ये सुरूवातीला महादेव गिरमे यांनी कोव्हिडचे उपचार घेतले. तेथे अपुरा ऑक्सिजन मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. छातीला सूज असतानाही हाय प्लोचा ऑक्सिजन दिला गेला नाही. वेळीच उपचार केले गेले नाहीत असा आरोप गिरमे कुुटुंबियांनी केला आहे. परिस्थिती नाजूक झाल्याने टॉसिलीझूमाब हे औषधे देण्याचे ठरले. हे औषध मिळविण्यासाठी स्थानिक आकाश मेडिकलचे जाधव यांनी गिरमे यांना रात्री 1 वाजता टॉसिलीझूमाब औषध उपलब्ध करून दिले. या औषधामुळे रूणांचे प्राण वाजले मात्र आजार पूर्ण बरा झाला नाही. रूग्णांवर योग्य उपचार करण्यास मुळशी हॉस्पिटल असमर्थ झाल्याने त्यांनी रूग्णाच्या कुटुंबियांना दुसरीकडे उपचार घेण्यासाठी तगादा लावला होता.
गेली दोन महिने चुकीचे उपचार करणार्‍या मुळशी हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार समन्वय समितीने केली आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close