पुणे
Trending

भीमनगर परिसरातील मुलांना बालदिनाच्या औचित्याने ग्रंथभेट

वाचनसंस्कृतीच्या प्रसारार्थ संदर्भ ग्रंथपालाचा उपक्रम

‘घरोघरी असावी ग्रंथसंपदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून बालदिनाचे औचित्य साधत शहराच्या पूर्वभागातील मंगळवार पेठ येथील भीमनगर वस्तीतील दोनशेहून अधिक मुलांना मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील मनोरंजन व बोधपर गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुलांसोबतच शिक्षक-पालकांमध्येही वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी उत्तम साळवे, गीता राजू गजरमल, प्रतिभा भडसावळे, नारायण बनसोडे, सचिन जगताप, शब्बीर तांबोळी, याकुब शेख, कमलताई भालेराव, ठकसेन बनसोडे, प्रभाकर भडसावळे उपस्थित होते. अभिनेता गिरीश ओक, अष्टविनायक संस्कार वर्गाच्या संचालिका निरूपमा दिवेकर, प्रभाकर भडसावळे, शुभदा सुधीर मोघे यांनी पुस्तके भेट दिली. परिसरातील सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचालित अंगणवाडीतील मुलांसाठीच्या ग्रंथालयासही पुस्तके भेट देण्यात आली.
उपक्रमासंदर्भात बोलताना प्रसाद भडसावळे म्हणाले, ‘कुटुंबात व्यक्ती राहतात तितके ग्रंथ तरी घरात असावेत. ज्या घरांमध्ये ग्रंथ नाहीत अशांना भेट देऊन वाचनास प्रेरीत करण्याचा प्रयत्न असतो. कोरोना काळात ‘घरोघरी ग्रंथसंपदा’ असलीच पाहिजे, ह्याची जाणीव झाली. भेट पुस्तकात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह लिहिलेले स्टिकर स्वरुपातील संदेशही वाचनासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.’

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close