
महावार्ता वृत्तसेवा: गुन्हेगारांपेक्षा सात बारा कोणाचा याचा तपास करणार्या अधिकार्याची हिंजवडीतून बदली झाली असून कर्तव्यदक्ष बाळकृष्ण सावंत यांची हिंजवडीचे नवे पोलिस निरीक्षकपदी वर्णी लागली आहे.
हिंजवडीतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाकरीता थेट मंत्रालयातून सेटिंग लावली असल्याचा इतिहास आहे. मात्र नवे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी राजकीय दबावाला कात्रजचा घाट दाखवित कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्याना योग्य पोलिस ठाण्यात बदली केली आहे.
यापूर्वी युनीट 5 गुन्हे शाखेत कार्यरत असलेले बाळकृष्ण सावंत यांनी कोट्याधीश रूपयांचे ड्रग्स जप्ती प्रकरणाचा तपासात मोठी कामगिरी केली होती. या कामगिरी बद्दल आयुक्त कृष्णप्रकाश यांनी हिंजवडी आय टी पार्कच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा बाळकृष्ण सावंत त्यांच्यावर सोपवली आहे
Share