पुणे
Trending
मुळशीतील कातकरी बांधवाना दिवाळी फराळाबरोबरच रोजगाराचे साधन म्हणून पिठाची गिरणी भेट
श्री सिद्घिविनायक गणपती देवस्थान मुळे वनवासी बांधवांची दिवाळी गोड

श्री सिद्घिविनायक गणपती देवस्थान संस्थेच्या वतीने मुळशी तालुक्यातील कळमशेत व आंदेशे येथील वनवासी बांधवाना दिवाळीचा फराळ व भेटवस्तू देण्यात आल्या त्यामुळे वनवासी बांधवांची दिवाळी गोड झाली आहे.
श्री सिद्घिविनायक गणपती देवस्थान संस्था ही पुण्यातील सामाजीक क्षेत्रात काम करणारी ८० वर्षे जुनी संस्था असुन विवीध प्रकारची समाजोपयोगी कामे करत असते. करोना, निसर्ग वादळ या सध्या आलेल्या आपत्तींमधे सुद्धा संस्थेने समाजाला भरीव मदत केली आहे.
संस्थानने वंचीत वर्गासाठी भरीव व कायमस्वरूपी काम करायचा विचार करून त्यासाठी मुळशी भागातील काही वनवासी वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या वस्तीतील लोकांसाठी आत्मनिर्भर योजना राबवावी हा निर्णय केला. यामधे वस्तीतील तरुणांना प्रशिक्षण देणे, महिलांना स्वावलंबी करणे, मुलांना शिक्षण देणे, आरोग्यसुविधा ऊपलब्ध करणे या व अशा योजना घेऊन संस्थेने आंदेशेवस्ती व कळमशेत वस्ती मधे सुरवात करायचे ठरवले आहे. याची सुरवात म्हणून दिवाळी फराळाचे पदार्थ देऊन व त्याचवेळी स्वयंरोजगारा साठी दोन लाभार्थीना घरेलु आटा चक्की देऊन केली आहे.
– अविनाश नाईक, कार्यवाह श्री सिद्धिविनायक देवस्थान संस्था,पुणे)
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुहास मेढी, कार्यवाह अविनाश नाईक, कोषाध्यक्ष नरेश भसे व विश्वस्त अजय कुलकर्णी ,राष्र्टीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे अनिल व्यास व प्रदीप पाटील तसेच संपर्क संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. वस्तीतील तरूण, महिलांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला व या स्वयंरोजगार योजनेचा त्यांच्या प्रगतीसाठी ऊपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या अडचणींचा पाढा संस्थेच्या पदाधीकार्यां समोर वाचला. पदाधिकार्यांनी वस्तीतील नागरीकांना मदत करू असे अश्वस्त केले. कल्पेश रोकडे यांनी संपर्क संस्थेच्या योजनां बद्दल माहीती दिली. स्वप्नील गंगणे यांनी सुत्रसंचलन केले व राजू जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
Share