पुणे
Trending
सुवर्णकन्या वैष्णवी मांडेकरने केली आदिवासी सोबत दिवाळी साजरी
मुळशीतील कातकरी कुटुंबाना दिवाळी फराळ व कपड्यांची दिली भेट

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग व कराटेपटू वैष्णवी मांडेकरने आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
मूलखेड येथील कातकरी वस्तीत जाऊन तेथील 14 आदीवासी कुटूंबाना दिवाळी फराळ व कपडे भेट देऊन तिने अगदी साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.
मुळची चांदे ता. मुळशी येथील रहिवासी असलेली वैष्णवी बाल वयापासूनच कराटे व बॉक्सिंगची आवड असल्याने ती त्यात करिअर करीत आहे. बालवयातच तिने राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत आपले नैपुण्य दाखवून गगनभरारी घेतली आहे. कराटे मातोल व बॉक्सिंग खेळात तिने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून अनेक पदकांची कमाई केली आहे. वैष्णविने मागील दोन वर्षांपूर्वीच जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेत काही मिनिटात हजार किलो फरश्या अंगावर फोडून नवा जागतिक विक्रम केला होता. त्यावेळी एक उत्तम कराटे पटू म्हणून तिची लिमका बुकने नोंद घेतली आहे .ती सद्या पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना पुणे विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे.
वैष्णवी मांडेकर व तिचे कुटुंबीय सातत्याने सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. लॉकडाउन च्या काळात आपल्या जुन्या मित्र मैत्रिणी व कुटुंबियांच्या मदतीने वैष्णवीने हजारो सिड्स बॉल तयार करून चांदे गावाच्या डोंगरावर व परिसरात त्याची लागवड केली आहे. त्याचबरोबर
सीड बॉलपासून तयार केलेली काही रोपे तिने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेला माजी विदयार्थीनी या नात्याने भेट दिली आहेत . त्यानंतर तिने मूलखेड (ता.मुळशी)येथील कातकरी कुटूंबाना कपडे व फराळ भेट देऊन त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, माजी सरपंच बाळासाहेब तापकीर, माजी सरपंच सुखदेव तापकीर, वैष्णवी चे वडील व कांग्रेस कमिटी चे जिल्हा सरचिटणीस दादाराम मांडेकर ,मुळशी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ससार, कार्याध्यक्ष प्रदीप पाटील , संतोष तापकीर, बाजीराव पवार, ज्ञानेश्वर तापकीर, शंकर तापकीर,शिवाजी रघुनाथ तापकीर ,पप्पू तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मातेरे यांनी वैष्णवी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कातकरी कुटूंबासोबत साजऱ्या करत असलेल्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. सुत्रसंचालन व प्रस्ताविक बाळासाहेब तापकीर यांनी केले.
फोटो :- मूलखेड ता. मुळशी येथे 14 कातकरी कुटूंबाना दिवाळी भेट व कपडे व मिठाई देऊन आंतर राष्ट्रीय क्रीडा पटू वैष्णवी मांडेकर ने आपला वाढदिवस साजरा केला यावेळी उपस्थित मान्यवर
Share