क्राइम
Trending
हिंजवडी, माण, बावधनमधील गुन्हेगारी समूळ नष्ट करणार : बाळकृष्ण सावंत
राजेंद्र बांदल यांच्यासह पत्रकारांनी केले सावंत यांचे स्वागत

महावार्ता वृत्तसेवा: हिंजवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आय टी पार्कसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गुन्हेगारी समूळ नष्ट करणार असल्याचे हिंजवडीचे नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पत्रकारांच्या भेटीत सांगितले.
हिंजवडीतील नवे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे आज मुळशीतील पत्रकार व पेरिविंकल स्कूल संस्थापक राजेंद्र बांदल यांनी स्वागत भेट घेतली. यावेळी पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष रमेश संसार, महावार्ता न्यूज पोर्टलचे संपादक संजय दुधाणे, रोखठोकचे संपादक गणेश हुंबे, पत्रकार दादा आढवराव, सागर शितोळे, सचिन विटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंजवडी, माणसह बावधनसह हद्दीतील सर्व गुन्हेगारांचा समूळ उच्चाटन करण्यावर आमचे लक्ष असेल, हुक्का रेवपार्टीवरही कारवाई केली जाईल. गैर कामांची माहिती मिळताच कडक कारवाई करण्यात येईल
– बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिंजवडी
हिंजवडीत जी एस माडगूळकर यांच्या नंतर कार्यतत्पर पोलिस निरीक्षक सावंत असल्याचे सांगून रोखठोक न्यूजचे गणेश हुंबे म्हणाले की, सावंत यांच्या कडून मोठी कामगिरी होईल.
Share