राजकीय
Trending

मुळशीत पदवीधरसाठी 43 टक्के मतदान, पौडमध्ये सर्वाधिक 78 टक्के मतदानांची नोंद

महावर्ता न्यूज ः मुळशी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच लक्षवेधी ठरलेल्या पदवीधर व शिक्षक संघाच्या मतदार संघासाठी मुळशी तालुक्यातून अनुक्रमे 42.92 व 56.82 टक्के मतदान झाले. मुठा केंद्रात सर्वाधिक 55 टक्के मतदान पदवीधर आमदाराकरीता करण्यात आले तर शिक्षक मतदार संघासाठी पौडमध्ये सर्वाधिक मतदानांची नोंद 77.69 टक्के नोंद झाली.
मुळशीत इतिहासात प्रथमच पदवीधरकरीता 1442 पदवीधर मतदार तर शिक्षक मतदार संघातून एकूण 516 मतदारांची नोंद झाली होती. मात्र मतदान करण्यासाठी फारसा उत्साह दिसून आला नाही. दुपारी 1 पर्यंत मुळशीत पदवीधरकरीता 18 तर शिक्षक मतदार संघासाठी केवळ 19 टक्के मतदान झाले होते. यामुळे 50 च्या आसपासच मतदार येतील हा अंदाज होता.
पदवीधर मतदार संघाकरीता मुळशीत पाच मतदान केंद्र होती. यापैकी लवळे गावात सर्वाधिक मतदान असल्याने लवळे परिसरात दिवसभर राजकीय कार्यकर्त्यांची रेलचेल दिसून येत होती. घोटावडे, मुठा केंद्रावर सामसूम होती. पौड केंद्रावर थोडी वर्दळ दुपारपर्यंत होती. सर्वच मतदार केंद्रावर महिला मतदारांचा निरूत्साह दिसून आले. महिलापेक्षा जास्त मतदान पुरूष मतदारांनी केले आहे.
पदवीधर मतदार संघासाठी मुळशी भाजपचे कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी दुपारी लवळे मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजविला. मतदान केल्यानंतर पत्रकारांची त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बांदल म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे पुणे पदवीधर मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे यावेळी सिध्द होईल. मुळशीतूनही पदवीधरसाठी भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना 1 नंबरची पसंतीकडे कल निकालात दिसून येईल.
राजेंद्र बांदल, कार्याध्यक्ष भाजपा मुळशी

मुळशीत पदवीधर मतदार संघासाठी केंदनिहाय झालेलेे मतदान पुढीलप्रमाणे

घोटावडे – 39.42
लवळे – 49.52
लवळे – 36.27
मुठा – 55
पौड – 43.39
शिक्षक मतदार संघासाठी सकाळपासून तालुक्यात शिक्षक संघटनेने सर्वाधिक मतदानासाठी मोर्चबांधणी केली होती. यामुळे सकाळी कमी झालेली गती दुपारनंतर वाढलेली दिसली. पदवीधरपेक्षा शिक्षक मतदारांनी मुळशीत अधिक मतदान केले. पौडमध्ये सकाळपासून शिक्षकांचर वर्दळ मतदान केंद्रावर होती. यामुळे सर्वाधिक मतदान करण्यात पौड केंद्र आघाडीवर राहिले.

मुळशीत शिक्षक मतदार संघासाठी केंदनिहाय झालेलेे मतदान पुढीलप्रमाणे

घोटावडे – 50
लवळे – 52.11
मुठा – 10
पौड – 77.69

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close