
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी भुकुम येथील माजी आदर्श सरपंच नामदेव अण्णा माझीरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माझीरे ज्यावेळेस सरपंच होते त्या काळामध्ये ते तालुक्यात सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून आले होते त्याच प्रमाणे गावचा विकास सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला आहे. त्याच कामाची पावती म्हणून पक्षाच्या वतीने त्यांना
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सोनबा चौधरी, सोपानराव नवले, विलास रासकर, रंगनाथ कड,राजाभाऊ हगवणे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे सुनील चांदेरे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ शिवदीप उंद्रे, सतीश एकनाथ उंद्रे ,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share