क्राइम
Trending
सूस गावात ऑनलाईन मटका अड्डयावर कारवाई, मटकामालकांसह 6 जणांना अटक, कार जप्त
हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई

महावर्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील सूस गावात शनिवारी हिंजवडी पोलिसांनी ऑनलाईन मटका अड्डयावर धडक कारवाई केली. 1,00,610 रूपयांचा माल जप्त करून मटका मालक भिमाशंकर रामकिसन चांदोरे यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी 5 डिसेंबरला दुपारी 3 वाजता वाजता वरिष्ठ पोलिस निरिक्षक बालकृष्ण सावंत यांना माहितीमिळाल्यानुसार सूस गावात ऑनलाईन मटका अड्डयावर धाड टाकण्यात आली. सुसगावातील गोपाळ चांदेरे चाळ, लाला संसार पिठ गिरणी मागे ऑनलाईन मटका सुरू होता. चांदेरे चाळीतून 1 ) भिमाशंकर रामकिसन चांदोडे वय 42 वर्ष, धंदा मजुरी रा. गोपाळ चांदेरे चाळ लाला संसार पिठ गिरणी मागे सुसर्गाव ता. मुळशी जि. पुणे 2) नवनाथ दासु सोनवणे वय 36 वर्षे. धंदा- ड्रायव्हर, रा. स.नं. 228, ठकसेननगर सुसगाव ता. मुळशी जि. पुणे. 3) कचरु अंकुश कांबळे, वय 32 धंदा मजुरी रा. नाना ससार यांचे खोलीत निकाळजे वस्ती जवळ, सुसगांव ता. मुळशी जि. पुणे 4) जयसिंग चांदेरे रा. सुसगांव ता. मुळशी जि. पुणे या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता कल्याण नावाचा मटका जुगार खेळत असताना रोख रु 610/- रोखही जप्त करण्यात आली.
मटका खेळत असल्याचे घरमालक हे 1) गोपाळ चांदेरे रा. सुसगांव 2) देवशालीनी भिमाशंकर चांदोरे धंदा मजुरी रा. गोपाळ चांदेरे चाळ लाला संसार पिठ गिरणी मागे सुसगाव ता. मुळशी जि. पुणे यांनाही मोबाईल सिमकार्ड काढून तोडुन फेकुण देउन पुरावा नष्ट केला यांचे असल्याने अटक करण्यात आले.
मुंबई जुगार कायदयानुसार 6 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडील एक लाख रूपयांची मारूती ओमनी कार जप्त करण्यात आली. आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक कविता रूपनर व राजेभोसले करीत आहे.
Share