पुणे
Trending

मुळशीत सोमवारी तलाठी, सर्कलविरूध्द आंदोलन, आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हे नोंदविणार

महावर्ता न्यूज ः मुळशीत ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी काही गावात वेगळ्या वळणावर आली आहे. परराज्यातील मजूर, कामगारांची मतदार नोंद झाल्याने तलाठी व सर्कलविरूध्द सोमवारी तहसील कार्यालया समोर शिवसेना निर्दशने करणार आहेत. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्यास प्रशासनाकडून गुन्हे नोंदविले जाणार आहे.
मुळशीतील मतदार नोंदणीबाबत पूर्वकडील गावांनी हरकती घेतल्या आहेत. 100 पेक्षा अधिक नावे ही परराज्यातील, पर जिल्ह्यातील कामगारांची लावण्यात आली असल्याची तक्रार जांबे, कासारअंबोली, मारूंजी, हिंजवडीतील संभाव्य उमेदवरांनी केली आहे. या मतदारांची शासकीय निर्णयानुसार स्थळपाहणी करून ही नावे रद्द करावी अशी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख अविनाश बलकवडे यांची मागणी आहे. या मागणीला तहसीलदार अभय चव्हाण यांनी प्रतिसाद न दिल्याने तलाठी, सर्कलविरूध्द सोमवारी 14 डिसेंबरला तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा पवित्रा मुळशी तालुका शिवसेनेने घेतला आहे.
गावातील काही पुढार्‍यांनी तलाठी व सर्कल यांना हाताशी धरून गावात न रहाणार्‍या लोकांची मतदार नोंदणी केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. स्थळपाहणी करून ही नावे वगळावी अशी शिवसेनेसह मुळशीतील राजकीय पक्षाची मागणी आहे. याबाबत मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकेतील संशयास्पद असल्याची तक्रार मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुळशीत शासकीय आदेशानुसारच मतदार नोंदणी झाली आहे. तालुक्यात 45 ग्रामपंचायतीत निवडणुका होत असून यापैकी एक-दोन ग्रामपंचायतीमध्ये तक्रार आहे. याबाबतही स्थळपहाणीचा आदेश देण्यात आला आहे.
– अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी शासकीय आदेशान्वये पूर्ण राज्यभर मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमानुसार दि. 1 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर दि. 7 डिसेंबरपर्यंत हरकती मागविण्यात मुदत देण्यात आली होती. सदर हरकतीची तपासणी करून नवीन शासन आदेशाप्रमाणे दि. 15 डिसेंबररोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरीता तयार होणारी मतदार यादी ही अतिशय शुदध असावी या प्रामाणिक हेतुने महाराष्ट्र शासनाने नवा आदेश पारित केलेले असून त्याची तंतोतंत अंमलबजावणी करून गावांमधील मतदारांची नावे, तसेच बोगस कागदपत्राच्या आधारे दाखल केलेली नावे कमी करण्याबाबत शासन आदेशाप्रमाणे अशा मतदारांबाबत मतदार केंद्रनिहाय अधिका-यांकडून (बी.एल.ओ.) क्षेत्रीय तपासणी अहवाल तयार करणे, बाहेरील मतदाराच्या नावांची खातरजमा झाल्यानंतर त्याबाबत बोलके आदेश (स्पिकिंग ऑर्डर्स) काढून सदर मतदारांची नावे वगळण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत.
मात्र मुळशी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या तक्रारी/ हरकती प्राप्त होवून देखील कोणत्याही प्रकारची क्षेत्रीय तपासणी बी.एल.ओ. व इतर कर्मचारी यांच्याकडून करून घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close