पुणे
Trending

हिंजवडी, माणमध्ये सोशल मिडियाव्दारे प्रचाराची रणधुमाळी सुरू

महावर्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील कोट्याधीश ग्रामपंचायती हिंजवडी व माणमध्ये निवडुणकीची अर्ज भरण्यापूर्वीच सोशल मिडियावर उमेदवारीची घोषणा करून प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे.
हिंजवडीमध्ये सरपंचपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी राखीव झाल्याने प्रत्येक वार्डमध्ये चुरस रंगणार आहे. 6 वार्डमध्ये 17 ग्रामपचांयती सदस्य हिंजवडीतून निवडून येणार आहे. यासाठी अनेक तरूण उमेदवारांनी सोशल मिडियावर प्रचाराचा नारळ फोडला आहे.
माणूस विश्वासाचा – आपल्या हक्काचा, लक्ष्य 2021 हिंजवडी ग्रामपंचायत, कणखर नेतृत्व विकासाचे, सर्वांसाठी …सर्वांसोबत, प्रदीर्घ अनुभव – कणखर नेतृत्व अशी घोषणा करून हिंजवडीतील तरूणांनी प्रचार सुरू केला आहे. यात महिलाही मागे नाहीत. आता लढायचं, आता भिडायचं या गाण्यावरही अनेकांनी व्डिडिओ तयार करून सोशल मिडियावर शेअर केले आहे.
व्हॉटस् अप आणि फेसबुकवरील प्रचाराला मोठी पसंतीही मिळत आहे. आपल्या आवडत्या उमेदवाराला लाईक करण्याचरही चढाओढ सुरू झालेली दिसते. गावातील अनेक व्हॉटस् अप गु्रप हे प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरत आहे. फोटो टाकून आकर्षक हेडिंग देऊन थेट मतदारांशी संपर्क साधण्याची संधी मुळशीत हिंजवडी, माणमध्ये सर्वाधिक आहे. मुळशीत 45 गावात निवडणूक होत असून बावधन, भूगांवमध्येही सोशल मिडियाव्दारे प्रचाराची धामधुम सुरू झाली आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close