पुणे
Trending

तहसिलदार अभय चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेचे भर पाऊसात आंदोलन

मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण हे एखाद्या पक्षाची सुपारी घेतल्यागत काम करत असून सर्वसामान्य माणूस तसेच शेतकऱ्यांनी शंभर वेळा चक्कर मारली तरी काम होत नाहीत. बावधनला बसून तलाठी कामकाज करत आहेत. सगळी कामे चुकीची चालली असल्याचा आरोप शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवान उभे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी पौड ( ता.मुळशी ) येथे केला.
युवासेना पुणे जिल्हा तसेच मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदार हटवा,मुळशी वाचवाचा नारा देत बोगस मतदार रद्द झाले पाहिजेत हि मुख्य मागणी करत पौड तहसिलदार कार्यालयाबाहेर भर पावसात आंदोलन केले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे,सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश बलकवडे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ, विद्यार्थी सेना जिल्हा संघटक राम गायकवाड यांनी तहसिलदार अभय चव्हाण यांच्या कारभारावर सडकून टिका केली. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख संतोष तोंडे, शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष माऊली डफळ,  स्वाती ढमाले, ज्योती चांदेरे आदी उपस्थित होते

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close