क्राइम
Trending

हिंजवडी हद्दीत गोंधळ घालून, भांडण करून बस लुटणारी महिलांची टोळी गजाआड

महावर्ता न्यूज ः हिजवडी पोलीस स्टेशनच्या हददीतन बंगलोर मुबंई हा हायवे रोड जात असुन या महामार्गावरून एस टी बस,लक्झरी बस व इतर प्रवासाची लाखो वाहने दररोज जात असतात. प्रवासी व तक्रारदार अर्चना मनोहर देवकर,वय-37वर्षे या कराड ते मुंबई असा प्रवास करीत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुतारवाडी ते राधा चौकदरम्यान आले असता बसमध्ये असलेल्या एकुण 7 महिलांनी फिर्यादी प्रवास करीत असलेल्या बस मध्ये चढून फिर्यादी जवळ जात त्यांच्याशी वाद घालला. धक्कबुक्की करुन अर्चना देवकर यांच्या जवळील सोने व चांदीचे दागिने असलेली पर्स व रोख रक्कम 10,000/- तसेच त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र असा एकून 1,83,200/-रुपयांचा ऐवज जबदस्तीने हिसका मारुन लुटला. लुुटारू महिला पळून गेल्याने हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आली होती.
हिंजवडी पोलीस स्टेशनकडील हायवे मार्शलवरील पोलीस अंमलदार महामार्गावरून गस्त घालीत असताना वर नमुद फिर्यादी हया बसने प्रवास करीत असताना एकुण 7 महिलांनी त्यांच्याशी भांडणे काढून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व पर्स चोरून बस थांबल्यानंतर त्या महिला उतरून पळुन जात असल्याची खबर प्राप्त झाल्याने हायवे मार्शलवरील पोलीस अंमलदार तानाजी टकले,अविनाश सगर, असे सदर ठिकाणी जावुन पळुन जाणा-या एकुण सात महिलांना महिला नागरिक यांना सोबतीला घेवुन ताब्यात घेवुन महिला पोलीस आल्यानंतर पोलीस स्टेशनला घेवुन येवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.सदर सात महिलांना अटक करून त्यांना मा कोर्टात हजर ठेवुन त्यांची पोलीस कस्टडीची रिमांड घेवुन त्यांच्याकडे गुन्हयांबाबतचा सखोल तपास केला असता त्यांनी वर नमुद फियादा याच सोन्याच दागिने ,पर्स असा एकुण 1,83,200/- रूपयांचा मौल्यवान दस्तऐवज ताब्यात घेण्यात आलेला आहे.
सदर महिला हया बंगलोर मुंबई हायवे वरून जाणा-या बसने घोळक्याने लहान मुलांना सोबत घेवुन प्रवास करून ज्या महिलांकडे मौल्यवान दागिने आहेत तिच्याशी भांडणे काढुन बसमध्ये गोधंळ करून त्या गोधंळाचा फायदा घेवुन त्या महिलांपैकी एक महिला ही मौल्यवान दागिने चोरत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.हया सर्व महिला हया मुळच्या सोलापुर येथील असन त्यांनी तपासामध्ये त्याची नाव व पत्ते खोटे सागितले आहे.हया महिलांनी सातारा ,कराड चांदणी चोक वाकड या पोलीस स्टेशनच्या लगत असणा-या पोलीस स्टेशनच्या हददीत येणा-या हमरस्त्यावर अशा प्रकारच्या ब-याच चो-या केल्याची दाट शक्यता असन हिंजवडी पोलीस त्याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.अशा प्रकारच्या चो-या करणा-या महिलांच्या मागावर पोलीस पिपरी चिचंवड पोलीस अनेक दिवसांपासुन त्यांच्या मागावर होते,ब-याच अथक प्रयत्नानंतर महिलांची ही चोरी करणारी टोळी पोलीसांच्या हाती लागली असुन त्यांच्याकडुन आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पिपंरी चिचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश ,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ,परिमंडळ दोनचे पोलीस उप-आयुक्त मा.आनंद भोईटे , वाकड विभागाचे सहा.पोलीस आयुक्त श्री गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत,पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड,तपास अधिकारी पो.उप.निरी.नंदराज गभाले, पोलीस अंमलदार अविनाश सगर,तानाजी टकले,विजय बंजनी महिला पोलीस अंमलदार रेखा थोत्रे,तेजश्री म्हशाले,भाग्यश्री जमदाडे,पुनम आल्हाट , यांच्या पथकाने केलेली आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close