पुणे
Trending

मुळशीसह पुण्यातील सरपंच सोडती रद्द, निवडणुकीनंतर पुन्हा आरक्षण

महावर्ता न्यूज ः सरपंच सोडतीचा शासन आणि निवडणुक आयोग यांच्यातील तळ्यात की मळ्यात हा खेळ बुधवारी दुपारी संपला असून मुळशीसह पुणे जिल्ह्यातील सरपंच सोडती रद्द करण्यात आल्या असून आता ग्रामपंचायत निकालानंतर पुन्हा नव्याने सरपंच पदाच्या आरक्षण सोडती काढण्याचा नवा शासकीय आदेश प्रेरीत झाला आहे.
गेल्या दोन दिवसापासून सरंपच सोडतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. याबाबत महावार्ता टीमने मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधून मंगळवारी माहिती घेतली होती. मंगळवार संध्याकाळपर्यंत तरी शासनाने नवा आदेश काढला नव्हता. यामुळे मुळशीतील सरपंच सोडती रद्द होणार नाही अशी बातमी महावार्ताने प्रकाशित केली होती
बुधवारी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी आठ डिसेंबर 2020 रोजी काढण्यात आलेली सरपंच आरक्षण सोडत रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
मतदानानंतर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण प्रक्रिया तसेच सरपंच व उपसरपंच यांची निवड 30 दिवसाच्या आत करण्याचे आदेश आहेत अशी माहितीही अभय चव्हाण यांनी महावार्ताला दिली आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close