क्राइम
Trending

हिंजवडीत इन्कमटॅक्स कारवाईची भीती दाखवून ११ लाखांची फसवणूक

पुण्यातल्या हिंजवडीत संगणक अभियंत्याला इनकमटॅक्सची कारवाई होईल अशी भीती दाखवून फक्त तोंड ओळख असलेल्या तरुणाने कॉम्प्युटर इंजिनिअरचा मोबाइल आणि नावाचा वापर करून ११ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी  ( वरुण संजयकुमार तिवारी वय- २४) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली असून स्वरूप मंजुनाथ शेट्टी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या दोघांची तोंड ओळख आहे. फिर्यादी हे हिंजवडीमधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता आहेत. दरम्यान, आरोपी स्वरूप याने वरून यांच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये मागितले होते. तेव्हा त्यांनी देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी स्वरूपने वरून यांना सांगितलं की तुमच्या बँकेच्या खात्यात मी दहा लाख रुपये पाठविले आहेत. ते मला रोख स्वरूपात द्या. त्यास त्यांनी होकार दिला. स्वरूप याने एस.बी.आय मणीपाल बँकेतून दहा लाख आर.टी.जी.एसद्वारे भरल्याचा मेसेज त्यांना दाखविला. मात्र फिर्यादी यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर आरोपी स्वरूप याने दहा लाख रुपये हे लिन अमाऊंट जमा झाल्याचा ऑनलाइन सिटी बँकेच्या पोर्टलवर फिर्यादी यांच्या नावावर जमा झाल्याचे दाखविले. ते पोर्टल सिटी बँक मॅनेजर चे असल्याचे सांगितले.

 फिर्यादी वरून यांच्या मेलवर We have found the transaction of Rs 10,000,00 on your pan liked account, kindly justify the source of transaction and source account असा बनावट इनकमटॅक्सवरून मेल आला. असे तीन मेसेज आले ज्यात टॅक्स भरण्याचा उल्लेख होता. त्यामुळे याची माहिती आरोपी स्वरूप ला दिली. तूच पैसे ट्रान्सफर केले होतेस असे सांगून टॅक्स तूच भर असे फिर्यादी यांनी सांगितले. मात्र त्याने उलट टॅक्स न भरल्यास कारवाई होईल अशी भीती फिर्यादी यांना दाखविली. टॅक्सचे पैसे भरण्यासाठी इतरांची मदत घेतली. त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, त्याच दरम्यान स्वरूप याने फिर्यादी वरून यांच्या नावाचा आणि मोबाइल चा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि ऍपवरून चार लाखांचे कर्ज घेतले.
एवढंच नाही तर क्रेडिट कार्ड घेऊन लाखो रुपये काढले असे एकूण ११ लाख रुपये टॅक्स भरल्याचे फिर्यादी यांना सांगितले तसेच मेलवर रीतसर पावती येईल अस सांगण्यात आलं. मात्र, झालं उलट दुसऱ्या दिवशी आरोपी स्वरूपला हिंजवडी  कर्नाटक पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं फिर्यादी वरून यांना समजलं. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत देंडगे करत आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close