
महावार्ता न्यूज – करोना महामारीने अनेकांचे बळी घेतले आहेत. परंतु मुळशी तालुक्यातील हिंजवडीतील 105 वर्षांच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती आणि सुयोग्य उपचाराच्या जोरावर करोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव आहे. माजी सरपंच श्यामराव हुलावळे यांच्या त्या आजी आहेत.
प्रबळ इच्छाशक्ता आणि योग्य उपचारांच्या जोरावर 105 वर्षांच्या आजींनी करोनावर मात केली आहे. ’करोना झाला, तरी खचून जाऊ नका,’ असा मोलाचा सल्ला त्यांनी करोनाबाधितांना दिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्म झालेल्या शांताबाईंची आजही ठणठणीत आहे. आपले नातू, मुली यांना त्या नावाने हाक मारीत असतात. वारकरी संप्रदाय आणि शुध्द आहारामुळे आजही त्यांची रोग प्रतिकार क्षमता प्रभावी असल्याने त्यांनी कोरोनाला हरवले आहे. त्यांना तीन मुले व तीन मुले असा मोठा परिवार आहे.
हिंजवडीत राहणार्या शांताबाई हुलावळेंना खोकला, दम लागणे अशा तक्रारी जाणवत होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यांची करोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली. ’आजींच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली होती; तसेच एक्सरे चाचणीत न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना तातडीने ऑक्सिजन लावून उपचार सुरू केले. मात्र, त्यांचे वय आमच्यापुढचे सर्वांत मोठे आव्हान होते. वयस्कर करोनारुग्णांच्या रक्तात गुठळ्या होऊन फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणार्या वाहिन्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रुग्ण कोसळून व्हेंटिलेटरवर जाण्याची भीती असते. त्यामुळे आम्ही आजींना चेस्ट फिजिओथेरपी, इंटेसिव्ह स्पायरोमेट्री, रक्त पातळ करणारी औषधे असे उपचार देत होतो. त्यांनीही या उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे 1012 दिवसांच्या उपचारांनंतर आजीबाई करोनामुक्त होऊन घरी परतल्या,’ अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. किरण मुळे यांनी दिली
हुलावळे कुटुंबीयांसह आणि रुग्णालयातील कर्मचार्यांकडून हुजावळे आजीबाईंना सतत धीर दिल्याने आजी ठणठणीत बरी होऊन घरी आल्या आहेत. कोरोनावर मात करून गावात येताच हिंजवडी परिसरात व कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आजीबाईंच्या प्रतिकारशक्तीची चर्चा तालुक्यात होत आहे.
Share