क्राइम
Trending

मुळशीतील मटका जुगार पोलिसांच्या जाळ्यात, नेरे दत्तावाडीतून दोन जणांना अटक

65,060 रूपयांचा माल जप्त, हिंजवडी पोलिसांची कारवाई

महावार्ता न्यूज -हिंजवडीजवळील नेरे दत्तवाडी परिसरात दुचाकीवर फिरुन मटका जुगार करणार्‍या दोन जणांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 65,060 रूपयांचा माल जप्त केला आहे.
स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना नेरे दत्तवाडी येथील कृष्णा हॉटेल समोरील सार्वजनिक जागेत जुगार सुरू असल्यसा माहिती हिंजवडी पोलीसांनी मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर आडबाजुस थांबून खात्री करता दोन जण कृष्णा हॉटेल समोरील पार्किग जागेत मोकळया ठिकाणी त्यातील एकजण अ‍ॅक्टीवा दुचाकावर व एक जण बाजुला बसून समोरील इसमाकडून पैसे घेवून त्यांनी सांगितलेले आकडे हातातील डायरीवर लिहून घेत असलेले दिसले. मिळालेल्या माहिती नुसार बसलेले दोन इसम मटका नावाचा जुगार घेत असल्याची खात्री झाल्यावर तेथे अचानक छापा घालून बसलेल्या दोन इसमांना अटक करण्यात पोलिसांला यश मिळाले. अटक करण्यात आलेले पुढीलप्रमाणे 1) तन्वीर कमरूद्दीन खाटीक शेख, वय 42, वर्षे रा. सुनिल विनोदे यांची खोली, येळवंडे वस्ती, हिंजवडी, पुणे 2) जय बालाजी गोसावी, वय 23 वर्षे रा. चिंतामणी नगर, गल्ली नं. 3, हांडेवाडी, हडपसर, पुणे अशी असून,
अटक केल्यानंतर दोन्ही गुन्हेगारांकडून मटका जुगारीचे साहित्य व एक अ‍ॅक्टीव्हा मोपेड, एक मोबाईल फोन असा एकुण 65,060/- रू. किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांचेकडे अधिक तपास करता ते मटका जुगार घेऊन मिळालेली रक्कम ही अवीश खान, रा. 16 नंबर थेरगाव, पुणे याचेकडे देत असून ते दोघेही आवीश खान याचेसाठी काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन सदर तीन इसमावर हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोठेही अवैध धंदे चालू असल्याचे निदर्शनास आल्यास हिजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाळकृष्ण सांवत, मो.नं 8767223131 व सहा.पोलीस निरीक्षक सागर काटे मो.नं 7722046100 यावर संपर्क करुन माहीती दयावी. माहीती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे हिंजवडी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त, कृष्णप्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांचे मागदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक(गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथकाचे प्रमुख स.पो.नि. सागर काटे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, महेश वायबसे, बंडू मारणे, कुणाल शिंदे, आतिक शेख,सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, झनक गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, रितेश कोळी, कारभारी पालवे, दत्तात्रय शिंदे यांनी केलेली आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close