देशविदेश
Trending

गुरु -शनी ग्रहांची दुर्मिळ युतीची आठवडाभर पर्वणी

डॉ राजेंद्र भस्मे, खगोल अभ्यासक

 २७ डिसेंबरपर्यंत सायंकाळी सूर्यास्तानंतरच्या आकाशात पश्चिमेला एक नाट्य चालू असेल सूर्यास्तानंतर पश्चिमेला क्षितिजाच्या थोडे वर आलेल्या दोन तेजस्वी ग्रहांनी खगोलप्रेमींसाठी सोमवारची सायंकाळ पर्वणी ठरली. तब्बल ३९७ वर्षांनी अवकाशात ‘गुरु- शनि ग्रहांची महायुती’ या अतिशय दुर्मीळ अशा खगोलीय घटनेचे दर्शन खगोलप्रेमींना झाले. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आल्याचा भास पाहणाऱ्यांना झाला. हे दोन ग्रह परस्परांपासून फक्त ०.१ अंश (६ मिनिटे ६ आर्कसेकंद) इतक्या कमी अंतरावर म्हणजे ७३५ मिलियन किलोमीटर इतक्या अंतरावर आले होते. कोल्हापुरात खगोल अभ्यासक किरण गवळी व डॉ राजेंद्र भस्मे यांनी चंबुखडी च्या टेकडी वर या दुर्मिळ युतीच दुर्मिळ दर्शन दुर्बिणीतून कोल्हापुरातील 200 लोकांना दिले यात विद्यार्थी शिक्षक महिला व वैद्यकीय व्यवसायातील नागरिकांचा समावेश होता दुर्बिणीतून फारच दुर्मिळ असे चित्र दिसले साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसले गुरु आणि शनि अगदी जवळ आले होते पण दुर्बिणीतून गुरु ग्रहाचे चार उपग्रह व शनी ची कडी चे दर्शन उपस्थितांना झाले त्यामुळे सर्व नागरिकांनी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी केला हवामानाात चांगलाच गारवा होता सहभागी मध्ये डॉ.किरण भिंगार्डे ,डॉ किरण जोशी आयटीआयचे प्राचार्य मुंडासे सरांचा समावेश होता
शनी ग्रह सूर्याभोवती पृथ्वीच्या एका वर्षाचा विचार करता साडे २९वर्षात एक फेरी पूर्ण करतो . तर गुरु ग्रह ११.८६वर्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो . त्यामुळे दर २० वर्षांनी गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे एकमेकांच्या जवळ येतात. मात्र या साली जितके जवळ आले आहेत तितके जवळ येण्याचा प्रसंग सुमारे ४०० वर्षांनी जवळ येतात. सध्या गुरु आणि शनी हे मकर राशीत आहेत . त्यामुळे जर तुम्हाला मकर रास आकाशात ओळखता आल्यास तुम्ही या गोष्टीचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकता सध्या सूर्य वृश्चिक राशीत असल्याने मकर रास सूर्यास्तानंतर लवकर उगवते आणि मावळते . ( सूर्य ज्या राशीत असतो ती रास आकाशात तर दिसतच नाही. मात्र राशीचक्रातील त्या पुढच्या राशी सूर्यास्तानंतर लवकर उगवतात आणि लवकर मावळतात . त्यामुळे मकर रास लवकर मावळणार आहे ) त्यामुळे येत्या आठवड्याभरत तुम्ही सूर्यस्तानंतर लगेच आकाशदर्शन केल्यास तुम्ही या नाट्याचा आंनद ,मनमुराद घेऊ शकता
खगोलशास्त्रानुसार पृथ्वीपासून अंतरे (किलो मिटर) :—(१)चंद्र :- 4 लक्ष..(२)सूर्य:- 15 कोटी..(३)बुध:- 10 कोटी..(४)शुक्र :- 5 कोटी .. (५)मंगळ:- 8 कोटी..(६)गुरू:- 65 कोटी..(७)शनी :- 130 कोटी ..(८) हर्षल:- 270कोटी..(९)नेपच्युन:- 440 कोटी. [ सर्व ग्रह फिरत असल्याने ही अंतरे बदलत असतात. सरासरी अंतरे दिली आहेत.]
गुरु आणि शनी या दोन ग्रहांची सध्या अवकाशात युती झाली. या दोन ग्रहांमधील अंतर जवळपास ४००प्रकाश वर्षांनी सर्वात कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे अंतर सातत्यानं कमी होत आहे. सोमवारी हे अंतर सर्वात कमी म्हणजे अवघे 0.1 अंश इतके झाले त्यामुळे उघड्या डोळ्यांना हे दोन्ही ग्रह एक झाल्याचे दिसले
आजचे वैशिष्ट्य २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वांत लहान दिवस आहे. ही अनोखी महायुती सूर्यास्तानंतर रात्री आठ वाजेपर्यंत दिसली २१ डिसेंबरला उत्तर गोलार्धात सुर्य दक्षिणेकडे मकर वृत्ता पर्यत पोहोचला काल सर्वात मोठी रात्र म्हणजे बारा तास पंचावन्न मिनिटांची तर सर्वात लहान दिवस अकरा तास पाच मिनिटांचा होता उद्यापासून सूर्य ऊत्तरे
कडे सरकू लागेल आणि२१ मार्चला तो विषुववृत्तावर असेल त्या नंतरआणखी उत्तरेकडे सरकून सूर्य २१ जून ला कर्कवृत्ताजवळ पोहोचेले या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते यापूर्वी हे ग्रह १६२३ साली हे दोन ग्रह एकमेकांच्या इतके जवळ आले होते. त्यानंतर आता थेट साठ वर्षांनी म्हणजे १५मार्च२०८० रोजी ते पुन्हा इतके जवळ येणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील ही एकमेव संधी होती. दोन ग्रहांमध्ये अवकाशात होणारी ही युती . न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन टी 20 मॅचच्या सीरिजमध्ये सध्या न्यूझीलंडकडे २-०अशी विजयी आघाडी आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये पाकिस्तानचा ९ विकेट्सने सहज पराभव केला. सेडन पार्कवर झालेली ही मॅच कव्हर करणाऱ्या कॅमेऱ्यात आकाशातला हा दूर्मिळ क्षण कैद झालापाकिस्तानने दिलेल्या टार्गेटचा न्यूझीलंडची टीम पाठलाग करत होती. न्यूझीलंडच्या डावामधील बारावी ओव्हर सुरु असताना कॅमेरामनने आकाशातील दुर्मिळ क्षण कैद केला.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close