
शिक्षण आणि संस्कार हाच यशोमार्ग असल्याचा प्रत्यय थोरांच्या चरित्रात पहाण्यास मिळतो. हीच यशोगाथा मुळशीरत्न राजेंद्र भगवान बांदल यांनी आपल्या जीवनप्रणालीतून आदर्शवत् केली आहे. निरक्षर आईविडलांकडून लाभलेली साक्षरतेचे डोळस दृष्टी आणि अभ्यासू वृत्त्तीने राजेंद्र बांदल हे मराठी पाऊल पुढेच पडत गेले. शैक्षणिक, सहकार, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात या बावधनच्या सुपुत्राने हिमालयाची उंची सर केली आहे.
◊
पेरिविंकल स्कूल आणि हिमालय नागरी पंतसंस्थेच्या माध्यमातून राजेंद्र बांदल हे नाव मुळशीच्या घराघरात परिचित झाले आहे. भाजपा जिल्हा कार्यकारिणी सक्रीय असल्याने पुणे व राज्याच्या राजकारणात त्याच्या नाव आदराने घेतले जाते. आता अॅग्रो टुरिझम, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, रेस्टांरंट या माध्यमातून हजारो हातांना ते काम देण्यासाठी कार्यरत झाले आहेत.
मुळशीचे प्रवेशव्दार असलेल्या बावधनचा शहरामोहरा आज बदलून गेला असला तरी पाच दशकापूर्वी बावधन हे मुळशीतील एक खेडेगाव होते. कोरडवाहू जमीन असणार्या बांदल घरण्यात राजेंद्र हे रत्न ख्रिसमसच्या पुण्यदिनी 25 डिसेंबर 1970 साली जन्मले. आई यशोदा, वडिल भगवान हे दोघेही निरक्षर. त्यात कुटुंबाची स्थिती हलाखीची. घरात कोणी कमवते नसल्याने थोरला मुलगा स ुरेश हा पाचवीपर्यंत शाळेत गेला. सुरेश लहानपणीच वडिलांच्या मदतीला आला. राजेंद्र ही धाकटापाती हुशार होती. मोठ्या भावाची जुनी पुस्तके घेऊन आणि फाटका गणवेश घालून हरहुन्नरी राजेंद्रची प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतच झाले. मुलगा बुध्दिमान निघाला. सतत वर्गात पहिला नंबर आल्याने आठवीपासून शिवाजीनगरच्या मॉडर्न शाळेत राजेंद्रची जडणघडण झाली.

कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सूत्र अंगिकारून मॉडर्नमधूनच पदवीधर झाले. या काळात बावधन ते शिवाजीनगर असा प्रवास अनेक वेळा त्यांनी पायाने केला. मूलभूत सुविधा नसताना त्यांनी कधीच शिक्षणाचा कंटाळा केला नाही. याच त्याच्या जीवनाचा आधार ठरला. शिक्षणाच्या माहेरघरात पदवीधर झाल्याने जगाची त्यांना जवळून ओळख झाली. शिक्षण पूर्ण होताच काही काळ पुणे अर्बन सहकारी बँकेत ते अकाउंटर म्हणून रूजू झाले. अल्पवधीतच बँकेची व्यवहाराची माहितीचे पूर्ण ज्ञान संपादन केले. नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावा याकडेच कल असल्याने त्यांनी बँकेचे काम सोडले. वयाच्या पंचविशीतच स्वतःची सहकारी बँक सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हीच त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना ठरली.
हिमालय नागरी सहकारी पतसंस्थची राजेंद्र बांदल यांनी 1995 मध्ये मुहूर्तमेढ रोवली. घरोघरी जाऊन भाग भांडवल उभे केले. ग्राहकांसाठी ठेव योजना सुरू केल्या. विश्वासार्हतेच्या जोरावर वर्ष दोन वर्षातच हिमालय पतसंस्थेचे रोपटे जोमाने वाढू लागले. कोट्यावधी रूपयांच्याठेवी आणि अडीच हजार कुटुंबियांना कर्ज देणारी आदर्श पंतसस्था असा लौकिक हिमालय पंतसंस्थने प्राप्त केला. बावधनमध्येच मुख्य कार्यालय सुरू करून मुळशी तालुका तसेच कोथरूड परिसरातून डेली कलेक्शन मध्येही हिमालय पतसंस्था आघाडीवर आहे. अ दर्जाच ऑडिटचा बहुमानच्या बांदल यांच्या पारदर्शक कार्यामुळे पतसंस्थेला मिळत आहे.

मुळशी परिसरातील मुले दर्जेदार व कमी शुल्क असलेले शिक्षणापासून वंचित असल्याचा अनुभव राजेंद्र बांदल यांनी स्वतः घेतला होता. यामुळे नव्या जगाच्या उभारणीकरीता पेरिविंकल इंग्लिश माध्यमाच्या शाळेचा श्रीगणेशा त्यांनी 2004 पासून केला. चैतन्य शिक्षण प्रतिष्ठानची स्थापन करून सहकारानंतर शैक्षणिक क्षेत्रातही बांदल यांनी दमदार पाऊल टाकले. 16 जून 2004 रोजी नवे शैक्षणिक दालन खुले केले तेव्हा पेरिविंकल शाळेत एका खोलीतच वीस विद्यार्थी होते. प्रायमरी, प्री-प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलचे पेरिविंकलेचे रोपटे हळूहळू बहरू लागले. ज्ञानदानाचा ध्यास असलेले शिक्षक लाभल्याने काही वर्षातच पेरिविंकलच्या कार्याची व्याप्ती वाढत गेली. बावधनमध्ये सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्यानंतर पेरिविंकल हे नाव सार्या पुणे शहरात नावाजले जाऊ लागले.
बावधननंतर 2011 मध्ये लवळे, 2012 सूस, 2014 पौड, 2016 पिरंगुट येथेही पेरिविंकलच्या शाखा सुरू झाल्या. आता सूसमध्येही स्वतंत्र इमारतीत पेरिविंकलचा ज्ञानयज्ञ सुरू आहे. पाच शाळांमध्ये चार हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. शाळेच्ची स्वतंत्र बससेवा असून 300 कर्मचारी वर्ग पेरिविंकलच्या यशात सहभागी आहे. बांदल च्या सहधर्मचारिणी सौ. रेखा बांदल यांचीही साथ शैक्षणिक विकासात मोलाची आहे.
पेरिविंकलच्या या ज्ञानयज्ञात प्रत्येक विद्यार्थी सक्षम व्हावा यासाठी पेरिविंकलचे संस्थापक – अध्यक्ष हे
कायमच कार्यरत असतात परंतु त्यांना बरोबरीने साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी संस्थेच्या संचालिका सौ. रेखा बांदल यांचेही मोलाचे योगदान आहे.तसेच शाळेची ही धुरा समर्थपणे चालवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सो नीलिमा व्यवहारे, सौ. निर्मल पंडित ,श्री अभिजित टकले, व सौ. रुचीरा खानविलकर यांचा मोलाचा वाटा आहे. कार्यवाहक रश्मी पाथरकर, शुभा कुलकर्णी, भक्ती माने ,पूनम पांढरे, सना इनामदार, पल्लवी नारखेडे, जिनी नायर व सर्व शाखेतील सर्व शिक्षकगण व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.पेरिविकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सर्व शाखांमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेजपर्यंतचे शिक्षण दिले जात असून कला, विज्ञान व वाणिज्य या तिन्ही शाखा उपलब्ध आहेत, ज्युनियर कॉलेजच्या दर्जेदार शिक्षणाबरोबरच सिनियर कॉलेज व व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याकडे
आता वाटचाल आहे.
बांधकाम व्यावसायातही बांदल यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिमालय डेव्हलपर्सच्या माध्यमातून महामार्गावरील कामेही त्याच्या कंपनीव्दारे वेळेत पूर्ण होत आहे. हिमालय सिक्युरिटीव्दारे सुरक्षा व्यवस्थापनातही ते आघाडीवर आहेत. सातशेपेक्षा अधिक कर्मचारीवर्ग बांदल यांच्या उद्योग-व्यवसायात कार्यरत आहे. सुजाण, आनंदी, कार्यशील भारत निर्मितीकरीता बांदल यांच्या समूहाने शिक्षण, सहकार, कृषी व व्यवस्थापन क्षेत्रात आदर्शवत अशी झेप घेतली आहे. मुळशी तालुका भाजपा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळित पक्षबांधणीतही ते अग्रेसर आहेत.
8
साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे बांदल दिवसभर आनंदीमय कायशैलीत मग्न असतात. आलेल्या सर्वांची प्रेमाने चौकशी करणे, ख्यालीखुशाली विचारणे याचा विसर त्यांना कधीच पडत नाही. सतत हसतमुख असणारे हे व्यक्तिमत्व वाचनप्रेमी आहे. सर्व प्रकारच्या पुस्तकाचे वाचन व त्यातील प्रेरक मुद्दांचे लेखन ते नियमती करीत असतात. लोकप्रिय असणार्या राजेंद्र बांदल यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आपल्या क्षेत्रात हिमालयाची उंची गाठणारे बांदल यांच्यासारखी आसामी आमदार, मंत्री व्होवो असा नारा आता घुमू लागला आहे. हीच त्याच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल.
कोरोना योद्धा – बांदल साहेब
मुळशी लॉकडाऊनच्या काळात राजेंद्र बांदल यांनी कोरोना महामारीची पर्वा न करता 5000 पेक्षा अधिक कुटुंबियांना फुड पॅकेट व धान्य वाटप केले. सारा देश बंद, दुकाने बंद, हातात काम नाही, खिशात पैसा नाही, अश्या काळात बांदल देवदूतासारखे मुळशीकरांच्या मदतीला धावले. मजुर, कामगार, क्वारंनटाईन केलेल्या लोकांना बांदल सलग दोन महिने मदत करीत होते.
कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू व मजूर लोकांना मदत करण्यात तालुक्यात राजेंद्र बांदल, निलेश दगडे, अमोल शिंदे, मधुर दाभाडे या चौघांनी सर्वात जास्त पुढाकार घेतला होता. बावधनपासून माले पर्यंत तालुक्यात सर्वच खोर्यात या मंडळींनी स्वतः विचारपूस करून गरजूंना हे वाटप करताना दिसत होते. या कोरोना योध्दांचे उपकार मुळशीकर कधीच विसरणार नाही.
Share