महाराष्ट्र
Trending

शापूरजी पालनजी बिल्डर्सकडून माणमधील ओढ्यात बांधकाम, शेतकरी संकटात

महावार्ता न्यूज ः जॉयव्हिला नावाने मुळशी तालुक्यातील माण गावात सुरू असलेल्या शापूरजी पालनजी बिल्डर्सकडून माण गावातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असणार्‍या ओढ्यातच बांधकाम केल्याने मुळशीतील शेतकरी संकटात सापडला आहे. मुळा नदीकडे जाणारे नैसर्गिक पाणी आडविल्याने नदीकाठच्या शेतीला ओढ्याच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे.
हिंजवडी आय टी पार्कमधील पेझ 1 मध्ये शापूरजी पालनजी बिल्डर्सचा जॉयव्हिला हा 11 एकरमध्ये गृहप्रकल्प साकारत आहे. 6 टॉवरच्या या प्रकल्पासाठी शापूरजी पालनजी बिल्डर्सकडून परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असणार्‍या ओढ्यातच रस्ता बनविण्यात आला आहे. यापूर्वी या 11 एकरमध्ये शेती केली जायची. पाऊसात येणारे पाणी ओढ्यामार्गे मुळानदीकडे जात होते. संपूर्ण प्रकल्पाचा ताबा घेताना सर्वच ओढे शापूरजी पालनजी बिल्डर्सने बुजविले आहेत. या प्रकल्पा बाहेरील मुख्य रस्ता हाच ओढ्यावर बांधण्यात आला आहे. याशिवाय 11 एकरमर्धील छोटे-छोटे पाण्याचे स्त्रोत बंद करून त्यावर टॉवर उभरण्याचे काम लॉकलाऊन नंतर वेगाने सुरू झाले आहे.

शापूरजी पालनजी बिल्डर्सकडून ओढाच गायब झाल्याने या प्रकल्पाच्या बाहेरील शेतकर्‍यांचा पाणी कोठे वळवावे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकल्पाच्या मागील बाजूस ओढ्याचा मार्ग तसाच पुढे गेल्याने अचानक मोठ्या प्रमाणात पुढच्या शेतात पाणी जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. याबाबत शापूरजी पालनजी बिल्डर्सच्या प्रकल्प अधिकार्‍यांने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
कोणतेही बांधकाम करताना नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतात बदल करता येणार नाही असे लिहून दिल्यानंतरच बिल्डर्सला बांधकामाची परवानगी दिली जाते. शापूरजी पालनजी बिल्डर्सने या आदेशाची पायमल्ली करून टॉवर इमले बांधणे सुरूच ठेवले आहे. ही बाब तहसीलदार अभय चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पंचनामा करून नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत बंद करणार्‍यावर कारवाई केली जाईल असे चव्हाण यांनी सांगितले आहे. याबाबत सर्कल नायकवडी यांनीही पंचनामा करून कारवाईचे संकेत दिले आहे.

दरम्यान शापूरजी पालनजी बिल्डर्सकडून बावधन येथे सुरू होणार्‍या नवीन गृहप्रकल्पातही अनाधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी स्थानिकाकडून होत आहे. अनाधिकृत रस्ता, कमान, तपासणी थांबा शापूरजी पालनजी बिल्डर्सकडून उभारण्यात आला असल्याने स्थानिकांना अनेक समस्यांचा समोारे जावे लागत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close