पुणे
Trending
बावधनमध्ये पेरिविंकल शाळेत स्मार्ट -एज्युकेशन सप्ताह संपन्न
बावधन मधील पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये तज्ञ -मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलच्या बावधन येथील प्रमुख शाखेमध्ये इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन शिबीर दि. 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर भरवण्यात आले. सध्या ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाची प्रॅक्टिस व एकाग्रता याचा ताळमेळ ऐन परीक्षेच्या वेळी कसा गाठता येईल, तसेच पेपर कसा लिहावा व अभ्यास कसा करावा याचे उत्तम मार्गदर्शन तज्ञ शिक्षकांकडून देण्यात आले.
या शिबिरासाठी पेरिविंकल शाखेच्या बावधन, सुस, पिरंगुट या तिन्ही शाखाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवली. सुमारे 80 विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
दि. 28 ते 31 डिसेंबत या कालावधीत या स्मार्ट एज्युकेशन साप्ताह शिबिराचे आयोजन केले होते. दि.28 तारखेला इंग्रजी विषयात पारंगत असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या निपुण तज्ञ मार्गदर्शिका सौ. संध्या पराडकर तसेच मराठी विषयासाठी पुढारी पेपरचे व्यवस्थापक श्री स्वामी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
दि. 30 डिसेंबर रोजी इतिहास या विषयावर प्रभुत्व असलेल्या MES च्या मार्गदर्शिका सौ. सुरभी भागवत या विषयतज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
दि. 29 डिसेंबर व 31 डिसेंबर रोजी सर्वात कठीण वाटणाऱ्या गणित व विज्ञान या विषयावर प्रभुत्व असणारे व गणिताचे पाठ्यपुस्तकं लिहिणारे श्री. दिलीप देशमुख सर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच या दरम्यान सर्व शाखामध्ये सुसूत्रता राखण्यासाठी सर्व शाखानमधील सर्व विषय शिक्षक एकत्र येऊन पेरिविंकल शाळेचा पाठ्यक्रम कसा शिकवावा व कशा पद्धतीने पाठ घ्यावा याचे मार्गदर्शन व सिलॅबस डिसायनिंग प्रोग्राम आयोजित केला होता.
ऑनलाईन मुळे प्रत्यक्ष शाळा सध्या बंद आहे. पुढील वर्षी मुलांची पाटी कोरी, अशा परस्थितीत जास्तीत जास्त शिक्षणाची पातळी कशी उंचावता येईल या विषयीचे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्याचा हा हेतू साध्य करण्याच्या या प्रयत्नाला यशस्वीपणे दुजोरा मिळाला. शिक्षणातज्ञ श्री देशमुख सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन याचे उदघाट्न करण्यात आले. शिक्षणाची पातळी कायमच कशी उंचावेल याचाच विचार करणाऱ्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक -अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या प्रयत्नांनी व कल्पक विचारांनी हे विद्यार्थी -शिक्षक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे नियोजन बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका सौ नीलिमा व्यवहारे समन्वयक सौ रुचिरा खानवलकर व सौ निर्मल पंडित तसेच पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक श्री अभिजित टकले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक यांच्या उस्फुर्त प्रतिसादाने हे मार्गदर्शन -शिबीर संपन्न झाले. यासाठी संस्थेचे संस्थापक मा बांदल सर व सौ रेखा मॅडम यांचे मोलाचे सहकार्य यामुळेच सर्व मुख्याध्यापक, समन्वयक व शिक्षस्कवृंद यांना नव्या उमेदीने 2021 मध्ये विद्यार्थ्यांना सहजपणे उत्तम पद्धतीने पाठबळ लाभले.
Share