क्राइम
Trending
पिरंगुटमधील 13 वर्षीय मिसिंग मुलीचा तासभरातच पौड पोलिसांकडून हायटेक शोध
पौड पोलिस स्टेशनची हायटेक शोध यंत्रणा

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावातील 13 वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी 10 च्या दरम्यान मिसिंग झाली होती. ज्युपिअर गाडी चालवित असताना ती हरवली असल्याची तक्रार पौड पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. पौड पोलिसांनी रिकॉर्डिग फोनचा वापर करून तासाभरातच मुलीचा शोध घेण्यात यश मिळवले.
ग्रामिण सुरक्षा दलातून शनिवारी सकाळी पिरंगुट परिसरातील अनेकांना फोन आले…. मी पौड पोलिय स्टेशनमधून बोलतोय, पिरंगुटमधील 13 वर्षीय मुलगी हरविली आहे. ज्युपिअर गाडीवर ती असून कोणाला दिसताच पौड पोलिस स्टेशनशह संपर्क साधा…. असे फोन अनेकांच्या मोबाईलवर खणखणले. कार्यशील वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ व त्यांची टीमची वेगाने तपासाला लागली. तासाभरातच मुलीचा शोध लागला.
याबाबत पौड पोलिस स्टेशनने थेट हायटेक शोध यंत्रणा राबविली आहे. परिसरातील शेकडो नागरिकांना रिकॉर्डिग फोन करून मुलीची माहिती देण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अपघात झाल्यानंतर पळून जाणार्या आरोपीला पकडण्यासाठी, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी रेकॉर्डिंग फोनचा यशस्वी वापर होऊ लागला आहे.
Share