पुणे
Trending

हिंजवडीतून शिवनाथ व दिपाली जांभुळकर बिनविरोध, वॉर्ड क्रं. 1 व 2  मध्ये लक्षवेधी झुंज

महावार्ता न्यूज ः हिंजवडीत अखेर बिनविरोध काही जागा येण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत यश आले आहे. शिवनाथ जांभुळकर व दिपाली शरद जांभुळकर यांच्या प्रतिस्पर्धींनी माघार घेतल्याने ते बिनविरोध निवडुन आले आहे. हिंजवडीत वॉर्ड क्रं. 1 व 2 मध्ये लक्षवेधी झुंज रंगणार आहे.
शिवनाथ जांभुळकर यांनी सलग दुसर्‍यांदा हिंजवडी ग्रामपंचायतीवर आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. वॉर्ड क्रं. 6 मधून यांनी माघार घेतल्याने त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा झाला. दिपाली शरद जांभुळकर यांनीही प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात यश आल्याने बिनविरोध निवड झाली आहे.

हिंजवडीतील वॉर्ड क्रं. 1 व 2 मधून चुरशीच्या लढती पहाण्यास मिळणार आहे. यापूर्वीचे ग्रामपंचायत सदस्य नागेश साखरे व विक्रम साखरे यांच्या विजयासाठी शर्यत पहाण्यास मिळणार आहे. माजी सरपंच सागर साखरे हेदेखिल वॉर्ड क्रं 2 मधून निवडणुकच्या आखाड्यात आहे. विशाल साखरे यांच्या विरूध्द त्यांचा सामना असेल. मात्र अनुभव व विकास कामांमुळे सागर साखरे यांचे पारडे जड समजले जात आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close