पुणे
Trending
मुळशीत 9 गावे बिनविरोध, 36 गावांत 570 उमेदवार रिंगणात
लवळे, कोळवण, मुठा, काशिग, बोतरवाडी, भालगुडी, आंबेगाव, भोईनी, नानेगाव बिनविरोध

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र सोमवारी रात्री स्पष्ट झाले. 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता 36 गावांत 280 जागांंकरीता 570 उमेदवार रिंगणात आहे.
कासारअंबोली येथील सैनिकी शाळेत दुपारपासून अनेकांच्या माघारीचा धावपळ सुरू होती. गावकी आणि भावकीच्या दबावाखाली अनेकांनी माघार घेतली. 7 वाजेपर्यंत माघारीचे प्रक्रिया सुरू होती. आता 45 पैकी 36 ग्रामपंचायती निवडणुक लागली असून लवळे, कोळवण, मुठा, काशिग, बोतरवाडी, भालगुडी, आंबेगाव, भोईनी, नानेगाव या 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. बिनविरोध होणार्या यादीत लावासा रोडवरील सर्वाधिक गावे आहेत.
मुळशी पॅटर्नच्या जोरावर लवळे गावही बिनविरोध झाले असून मुठा, भोईनी, बोतरवाडी गावेतूनही यापूर्वीच प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. 36 पैकी पौड, हिंजवडी, भुकूम, नेरेसह अनेक गावातील काही वार्डही बिनविरोध करण्यात अनेकांना यश मिळाले आहे.
आता 15 जानेवारीला निवडणुक होणार असून चिन्ळ वाटप झाल्याने गावगाड्याच्या नव्या कारभारीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
हिंजवडीतून शिवनाथ व दिपाली जांभुळकर बिनविरोध, वॉर्ड क्रं. 1 व 2 मध्ये लक्षवेधी झुंज
Share