क्राइम
Trending
मुळशीत बचत गटातील साडेसोळा लाख रूपयांची फसवणूक करणार्या दोन महिलांना अखेर अटक
४८ महिलांची साडेसोळा लाख रूपयांची फसवणूक

महावार्ता न्यूज ः माले ( ता.मुळशी ) येथील सीयाराम महिला बचत गटातील ४८ महिलांची साडेसोळा लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या दोन जणींना पौड पोलिसांनी अटक केली आहे. सविता भोलेनाथ घाग (वय ४३ , रा.माले) आणि स्वाती शिवाजी कदम ( वय ३५, रा. माले, मूळ रा.गोलांग्री, जि.बीड) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. सप्टेंबर महिन्यात याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
तीन वर्षांपूर्वी माले येथील ५० महिलांनी एकञ येत सियाराम नावाने महिला बचत गट सुरू केला. त्यात सविता घाग अध्यक्षा तर स्वाती कदम या सचिव होत्या. या दोघीही ४८ महिलांकडून दरमहा एक हजार रुपये गोळा करीत होत्या.
या महिलांनी दोघींना बँकेत खाते उघडण्यास सांगितले. परंतू आज उघडू, उद्या उघडू असे म्हणत दोघीही खाते उघडण्यास टाळाटाळ करू लागल्या. तीन वर्षात ४८ महिलांचे १६ लाखा ५६ हजार रूपये या बचत गटात जमा झाले होते. परंतू दोघींनी खाते उघडले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व महीलांनी १५ सप्टेंबरला पौडला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी ( ४जानेवारी) दोघींना अटक करण्यात आली. या दोघींना न्यायालयात हजर केले असता ८ जानेवारीपर्यंत दोघींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे पुढील तपास करीत आहेत.
Share