राजकीय
Trending
भुकूममध्ये प्रचारासाठी चक्क आणले वाजंत्री, आचारसंहितेचा भंग का कोव्हिड नियमांचे उल्लंघन ?

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील 36 गावांच्या ग्रामपंचायती निवडणूकीमुळे वातावरण तापत आहे. बुधवारी भुकूममध्ये चक्क वाजंत्रीच्या निनादात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. हा आचारसंहितेचा भंग का कोव्हिड नियमांचे उल्लंघन ? याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
मुळशीत 45 पैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 36 ग्रामपंचायती निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. राज्यात, मुळशीतही कोरोना रूग्ण सापडत असताना भुकूममध्ये केाव्हिड जमावबंदी आदेश धाब्यावर बसून वाजत्री निवडणुकीच्या लग्नाला आल्यासारखे ताशा, तुतारी, पिपानी वाजवित होते. भुकूम गावातील गाव चावडीवर काही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या निमित्ताने या वाजंत्री आले होते.
तालुक्यात अनेक गावात रात्रीच्या पार्ट्या सुरू झाल्या असून निवडणुक चिन्ह असणार्या वस्तूचे वाटपही सुरू झाले आहे. 2021 ची मुळशीची ही ग्रामपंचायत निवडणुक ऐतिहासिकतील सर्वाधिक खर्चाची निवडणुक ठरणार आहे. यासाठी होऊ द्या खर्च हा नारा गावोगावोत घुमू लागला आहे.
Share