पुणे
Trending

माणमधील वॉर्ड 6 मध्ये बस सुसाट, कपबशी जोरात, महेश पारखी, कल्याणी भरणेंचा विजय निश्चित

महावार्ता न्यूज ः मुळशीतील सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत असणार्‍या माण गावातील निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 6 मध्ये कल्याणी दिलीप भरणे व महेश महेश रामहरी पारखी यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याने बस सुसाट, कपबशी जोरात , आता विजय निश्चित असा जनमताचा कौल झाला आहे.
माणमध्ये श्री ग्रामदैवत काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच्या उमेदवारांना ग्रामस्थांनी प्रचारात मोठा प्रतिसाद दिला आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये कल्याणी दिलीप भरणे व महेश रामहरी पारखी हे दोन्ही कार्यक्षम उमेदवार दिल्याने प्रचारात या दोघांचे सर्वच मतदारांनी स्वागत करून आमचं मत बस व कपबशीलाच असा नारा दिला आहे.

सौ. कल्याणी दिलीप भरणे यांच्या कुंटुंबात मोठा राजकीय व सामाजिक तसेच धार्मिक व क्रीडा वारसा आहे. सौ. भरणे यांचे दिर सुनील भरणे यांनी सतत 20 वर्ष गावाचा विकासात भूमिका घेतली आहे. तर पती पै. दिलीप भरणे यांनीही सामाजिक व क्रीडा क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. विशेषतः परिसरातील युवकांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल दिलीप भरणे यांचे नाव माणच्या घराघरात घेतले जाते. यामुळेच माणचा विकास अधिक जोमाने करण्यासाठी सौ. कल्याणी दिलीप भरणे प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. मात्र त्यांचे कार्य व कामाची क्षमता पहाता असाच उमेदवार गावाचा चेहरामोहरा बदलून दाखवू शकतो अशी चर्चा सार्‍या माण गावात सुरू झाली आहे.
आपल्या जाहिरनामन्या 40 पेक्षा कामांचा संकल्प करणारे हे मतदार संघातील कार्यकुशल उमेदवार असल्याने हेच माणचे भावी कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य असतील असा संकल्प माणच्या वॉर्ड 6 च्या घराघरातून ऐकू येत आहे.
सर्वसाधारण खुला गटातून महेश पारखी यांच्या मागेही मोठा जनाधार आहे. पारखी यांचे आजोबा स्व.एकनाथ पारखी यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर निवडणुकीचा मैदानात उतरले आहे. भरणे व पारखी हे दोन्ही व्हिजन असणारे उमेदवार असल्याने वॉर्ड 6 मधून या दोघांनाच मतदारांनी कौल देण्याचा निर्णय घेतला आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close