
देशव्यापी कोविड लसीकरणाची मुळशी तालुक्यातील प्रारंभ माले प्राथमिक आरोग्य केंद्र व लवळे येथील सिम्बाँयसिस हाँस्पीटल येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख यांनी लवळे येथील केंद्राला भेट दिली.

सिम्बाँयसिस हाँस्पीटल येथे सिम्बाँयसिस विद्यापीठाचे कुलगुरू एस.बी.मुजुमदार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कोविड १९ चे लसीकरणाची सुरूवात सिम्बाँयसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. विजय नटराजन यांनी लस घेऊन केली. तसेच मुळशी तालुक्यातील माले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला असूनयेथील डाँक्टर्स,आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणाने याची सुरूवात करण्यात आली आहे. माले व लवळे येथे 100 आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे
सिम्बाँयसिस येथील लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी लसीकरणाची पाहणी करत लसीकरण केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी त्यांनी बातचीत केली. यावेळी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर,जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, उपसंचालक संजय देशमुख, सहाय्यक संचालक प्रसिद्धी डाँ.बाविस्कर उपस्थित होते.
महावार्ताशी बोलताना जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की, शहराप्रमाणे जिल्ह्यातही लसीकरण सुरळीत सुरू आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर कोणावरही कोणताही परिणाम झाला नाही.आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असून पुण्यात ३१ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाले आहेत.
Share