पुणे
Trending

मुळशीत हिंजवडी, माण, कासारअंबोली व उरावडे गावात लागणार धक्कादायक निकाल

महावार्ता न्यूज: मुळशीत आज दुपारचे बारा वाजण्यापूर्वीच अनेकांचे 12 वाजणार आहे. 36 ग्रामपंचायत निवडणुक निकालात मुळशीत हिंजवडी, माण, कासारअंबोली व उरावडे सह अनेक गावात लागणार धक्कादायक निकाल लागणार आहे
मुळशीतील 36 ग्रामपंचायतीत निवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून सोमवारी 18 जानेवारीला सकाळी अकरा-साडेअकरापर्यंत सर्व गावांचे निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे. कोरानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी 144 जमावबंदीचा आदेश दिला असल्याने गुलाल उधळल्यास, मिरवूणका काढल्यास गुन्हा नोंदविला जाणार आहे.
मुळशीत 108 वार्डात 222 जागांसाठी 515 उमेदवरांचे भवितव्य सोमवारी सकाळी बाराच्या आतच निश्चित होणार आहे. कासारअंबोली येथील सैनिकी शाळेच्या सभागृहात सकाळी 10 पासून मतमोजणीस प्रारंभ होईल. यासाठी प्रशासनाने 14 टेबलचे नियोजन केले आहे. प्रत्येक टेबलवर आठ फेर्‍यांचे मोजणी केली जाणार आहे. सर्वप्रथमच चांदे गावातील वॉर्डवचा निकाल जाहिर होणार असून पौड व मारूंजी गावातील काही वॉर्डचा निकाल सर्वात शेवटी जाहिर होणार आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचा मतमोजणी पहाता येणार आहे.
संपूर्ण तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीचे निकाल दुसर्‍या व तिसर्‍या फेरीत जाहिर होतील. वॉर्ड क्र. 1,2, व 3 चा निकाल पहिल्या फेरीत तर वॉर्ड 4,5, व 6 चा निकाल दुसर्‍या फेरीत जाहिर होईल. निकालासाठी प्रत्येक टेबलवर 4 सहाय्यक कर्मचारी असणार आहेत.
निकालनंतर विजयी उमेदवरांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पौड व हिंजवडी पोलिसांनी तसे आदेशही दिले आहेत. पौड पोलिसांनी निवडणुक असणार्‍या गावात 144 जमावबंदी व त्याचा आदेशही वाचून दाखविला आहे
जिल्हा पोलिस अधिक्षक 144 जमावबंदीचा आदेश
मतदान मोजणी च्या दिवशी , पुणे ग्रामीण जिल्ह्यात
1.कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढणे
2.रॅली काढणे
3.गुलाल उधळणे
4. फटाके फोडणे
5. परवानगीशिवाय फ्लेक्स बॅनर उभा करणे
6.रात्री दहानंतर हॉटेल, धाबे, पान टपरी चालू ठेवणे
यावर जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी कलम 144 अन्वये निर्बंध
घातले आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close