खेळ खेळाडू
Trending
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वाती शिंदे, भाग्यश्री फड पदकाचे दावेदार

महावार्ता न्यूज : आग्रा (उत्तरप्रदेश ) येथे होणाऱ्या २३ व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महााराष्ट्र संघाची निवड आज पुण्यात करण्यात आली. या स्पर्धेसाठी आशियाई पदक विजेती स्वाती शिंदे (कोल्हापूर) व आशिया पदक भाग्यश्री फंड (अहमदनगर) महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे .
करोना १९ च्या पार्श्वभूमीवर , शासकीय सर्व नियमाचे काटेकोर पालन करून रविवारी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र ( कात्रज ) येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून पारपडलेल्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा निवड चाचणी स्पर्धा पार पडली. निवड झालेला संघ दिनांक ३० ते ३१ जानेवारी आग्रा (उत्तरप्रदेश ) स्पर्धेत खेळणार आहे
स्पर्धा निवड चाचणी स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :-
वजन गट कुस्तीगिराचे नाव जिल्हा
५० किलो स्वाती शिंदे कोल्हापूर
५३ किलो नंदिनी साळोखे कोल्हापूर
५५ किलो दिशा कारंडे कोल्हापूर
५७ किलो विश्रांती पाटील कोल्हापूर
६२ किलो भाग्यश्री फंड अहमदनगर
६५ किलो श्रुष्टी भोसले कोल्हापूर
६८ किलो ऋतुजा संकपाळ कोल्हापूर
७२ किलो प्रतीक्षा बागडी सांगली
७६ किलो पौर्णिमा सातपुते कोल्हापूर
निवड झालेला संघ दिनांक ३० ते ३१ जानेवारी आग्रा ( उत्तरप्रदेश ) येथे होणाऱ्या २३ व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल . निवड झालेल्या सर्व कुस्तीगिरांचे हार्दिक अभिनंदन !
Share