राजकीय
Trending
हिंजवडीत परिवर्तन पॅनेलला 17 पैकी 15 जागांवर दणदणीत विजय
माजी सरपंच सागर साखरे यांचा पराभव, गणेश जांभुळकरने विजयाची हॅटट्रिक

महावार्ता न्यूज ः हिंजवडीत श्री ग्रामदैवत म्हातोबा परिवर्तन पॅनेलच्या 15 उमेदवरांनी बाजी मारल्याने सार्या गावात परिवर्तन पॅनेलचं चांगभलंचा जल्लोष सुरू झाला आहे. माजी सरपंच सागर साखरे यांचा पराभव झाला असून गणेश जांभुळकरने विजयाची हॅटट्रिक केली आहे.
अखेर हिंजवडीत गावात भाकरी फिरली असून वॉर्ड 3 मध्ये विशाल साखरे, वॉर्ड 1 मध्ये विक्रम साखरे, वॉर्ड 2 गणेश व सचिन जांभुळकर यांनी बाजी मारली आहे. पहिल्या टप्प्यात श्री ग्रामदैवत म्हातोबा परिवर्तन पॅनेलने दणदणीत यश संपादन केले आहे. 17 पैकी 15 जागांवर श्री ग्रामदैवत म्हातोबा परिवर्तन पॅनेलचा झेंडा फडकला असून एका जागावर म्हातोबा ग्रामविकास पॅनलला समाधान मानावे लागले. वॉर्ड 2 मध्ये सागर साखरे यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
विजयी उमदेवार पुढीलप्रमाणे
विजयी उमेदवार
हिंजवडी वॉर्ड 1 विक्रम वसंत साखरे – मते 979 विरूध्द नागेश साखरे – मते 507
हिंजवडी वॉर्ड 1 शिवानी जांभुळकर – मते 1073 विरूध्द स्मिता साखरे- मते 416
……….
हिंजवडी वॉर्ड 2 गणेश बन्सीलाल जांभुळकर – मते 1148
हिंजवडी वॉर्ड 2 सचिन नामदेव जांभुळकर – मते 1137
विरूध्द उमेश साखरे – मते 108 व सागर साखरे – मते 68
हिंजवडी वॉर्ड 3 विशाल लक्ष्मण साखरे – मते 769 वि. सागर साखरे – मते 528
हिंजवडी वॉर्ड 3 पल्लवी गंगावणे- मते 798 वि. आरती वाघमारे- मते 554
हिंजवडी वॉर्ड 3 प्रतिक्षा घोटकुले- मते 793 वि. उज्वला साखरे – मते 565
…….
हिंजवडी वॉर्ड 4 प्रदिप वाघमारे- मते 751
….
हिंजवडी वॉर्ड 5 मयूर साखरे- मते 882 वि. विलास साखरे – मते 622
हिंजवडी वॉर्ड 5 शुभांगी साखरे
हिंजवडी वॉर्ड 5 एैश्वर्या वाघमारे- मते 736 वि. संध्या वाघमाारे – मते 755
…….
हिंजवडी वॉर्ड 6 मच्छिंद्र हुलावळे- मते 915 वि. अक्षय हुलावळे – मते 743
हिंजवडी वॉर्ड 6 मनिषा हुलावळेे- मते 958 वि. सुलभा साखरे – मते 674
Share