
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालाले बांधकाम मजूर असण्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली असून चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या नंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित आहेत. सुदैवाने ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती होणारं ठिकाण सुरक्षित असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे.
Share