
मुळशी तालुक्यातील पिरंगुट व हिंजवडी शाळेतील गुणवंत शिक्षक रियाज शेख, झोळ व कळमकर यांना सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर यांच्या सौजन्याने बुलेट व ज्युपिटर गाडी महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्रअजित पवार यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी) मध्ये मुळशी तालुक्यातील पिरंगुट व हिंजवडी शाळेतील रियाज शेख, झोळ सर व कळमकर मॅडम यांनी सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, गटविकास अधिकारी संदिप जठार , गटशिक्षणाधिकारी बांगर, शिक्षण विस्तार अधिकारी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी तालुक्याने उत्तुंग यश संपादन केले आहे.
यामुळे सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर यांच्या सौजन्याने रियाज शेख सर व झोळ सर यांना प्रत्येकी एक बुलेट व कळमकर मॅडम यांना ज्युपिटर गाडी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते, पुणे जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , पंचायत समितीचे माजी सभापती व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेवअण्णा कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर, शिक्षण अधिकारी कुऱ्हाडे साहेब यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
यावेळी सत्कारमूर्ती, वरील सर्व मान्यवर पदाधिकारी मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शहाजी मारणे, विभागीय अध्यक्ष वाघूलकर सर, सरचिटणीस संतोष गावडे, माजी कार्याध्यक्ष शिवाजी चवले सर, विशाल कुंभार सर, येळे सर आदि शिक्षकवृंद उपस्थित होता. सर्व सत्कारमूर्तींचे संघातर्फे हार्दिक अभिनंदन होत आहे
Share