क्राइम
Trending

मुळशीतील कुडले खुन प्रकरणी 9 जणांना जन्मठेप

महावार्ता न्यूज: जमिनीच्या खरेदी विक्री वाद,टोळी वर्चस्व व पिंट्या मारणे याच्या खूनाचा बदला घेण्याच्या कारणावरून भुकूम मधील एकनाथ कुडले खून प्रकरणी 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
भुकूम ( ता.मुळशी ) येथे १ डिसेंबर २०१४ रोजी एकनाथ बबन कुडले ( वय.३२, रा. खाटपेवाडी, भुकूम ) याच्या
याचा भुकूम येथील रामेश्वर मंदिराजवळ खून करण्यात आला होता.या खूनप्रकरणी ९ आरोपींना न्यायालयाने जन्मठेप  व ५०००रु दंड व दंड न भरलेस ३ महीने सश्रम कारावासची शिक्षा सुनविली आहे.
जन्मठेप शिक्षा झालेले आरोपी
१)स्वप्निल विजय भिलारे, २)अनिल छबन खाटपे, ३)महेश दत्तात्रय वाघ , ४)स्वप्निल संभाजी खाटपे,५) वैभव प्रभाकर शेलार, ६)राम बाळू क़ेदारी, ७)हेमंत रमाकांत गोडांबे, ८)सागर संभाजी गोळे,९)पप्पू गणपत उत्तेकर यांनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हात, डोके,मान यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते.यात या नऊ जणांना दोषी ठरवून हि शिक्षा सुनविण्यात आली आहे.
विशेष सरकारी वकील म्हणून  विकास शाह यांनी कामकाज पाहिले.मयताचा भाऊ काशिनाथ कुडले हे या घटनेतील एकमेव साक्षीदार होते.
तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पानसरे, तत्कालीन  पोलिस निरीक्षक शिवशंकर मुंढे,पोलिस हवालदार अजित ननवरे,शंकर नवले यांनी आरोपीना अटक करून न्यायालयात दोषारोपपञ दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.कोर्ट कर्मचारी म्हणून पोलिस नाईक व्हि पी चौधरी यांनी कामकाज पाहिले. पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचे सदर गुन्हाकामी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close