खेळ खेळाडू
Trending
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नंदिनीला सुवर्ण-स्वातीला कांस्य, डाॅर्फ केटलची मदत आली फळाला…

महावार्ता न्यूज: अनेक वर्षाचा प्रतीक्षेनंतर वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला
कोल्हापूरच्या नंदिनी साळोखे रूपाने सुवर्ण पदक गवसले आहे. यामुळे मुंबईच्या डोर्फ केटल केमिकल कंपनीने नंदिनी व कांस्य पदक विजेती स्वाती शिंदे यांना केलेली मदत फळास आली आहे.
उत्तर प्रदेश मधील आग्रा येथील 23 व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवसही डाॅर्फ केटल केमिकल कंपनी पुरस्कृत कोल्हापूरच्या मल्लानी गाजविला. शनिवारी 50 किलो वजनी गटात स्वाती शिंदेने रिपॅचेसमध्ये कमबॅक करून कांस्य पदकाची कमाई केली.
रविवारी 53 किलो वजनी गटात नंदिनी साळोखेने सुवर्ण पदकाचा करिष्मा घडविला.
दिल्लीच्या ममतावर 4-0 आघाडीवर असताना चीतपट कुस्ती करीत नंदिनीने 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुवर्ण जिंकले.
मणिपूर, आंध्रप्रदेश व हरियाणा अंकुश कुमारीला पराभूत करून नंदिनीने अंतिम फेरीत धडक मारली होती.
कोल्हापूरच्या मुरगुड कुस्ती संकुलात दादा लवटे यांचे मार्गदर्शन व डाॅर्फ केटल केमिकल कंपनीचे आर्थिक सहकार्य नंदिनी व स्वातीला गेल्या 7 वर्षांपासून मिळत आहे.कंपनीने या दोघांसाठी व्यायामशाळाही उभी केली आहे.
डाॅर्फ केटल केमिकल कंपनीच्या सीएसआर मार्फत नंदिनीला सुरू असलेल्या मदतीचे सोने तिने आग्रातील स्पर्धेत केले. तिला व स्वातीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व सहकार्य केले जाईल असे डाॅर्फ केटल केमिकल कंपनीचे सीएसआर प्रमुख संतोष जगधने यांनी सांगितले.
Share