खेळ खेळाडू
Trending

महाराष्ट्र केसरीचा वाजला बिगुल; 28 फेब्रुवारी पर्यंत होणार जिल्हा निवड चाचणी

कुस्ती शौकिन ज्या स्पर्धेची आतुरता होती त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बिगुल वाजले असून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने सर्व शहर व जिल्हा तालीम संघांना सर्व निवड चाचणी 28 फेब्रुवारी 2021पर्यंत घेण्याचे परिपत्रका द्वारे कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असून कुस्ती सारख्या खेळावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील थोडा कमी झाला असून हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून लॉक डाऊनच्या काळात कुस्ती आखाडे व तालमी बंद होत्या त्या देखील काही दिवसांपासून सुरू झाल्या असल्या तरी कुस्ती मैदानाला व स्पर्धेला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे थोडी कुस्ती क्षेत्राला मरगळ आली होती. पण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने वेळोवेळी राज्य सरकारशी पाठपुरावा करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्याची परवानगी मिळवत कुस्ती क्षेत्रावर आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच खेळांच्या स्पर्धेवर मर्यादा आल्या असून यामुळे काही स्पर्धेच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चालू वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा परिषदेच्या पाठपुराव्यामुळे होत आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close